Nashik News : पेपरफुटीचे रॅकेट, भ्रष्टाचारामुळे नाशिकची राज्‍यभर चर्चा..!

कोरोनामुळे विस्कळित झालेल्या शैक्षणिक क्षेत्राचे वेळापत्रक यंदाच्‍या वर्षात सुरळीत झाल्‍याने लाखो विद्यार्थी, पालकांना दिलासा मिळाला आहे.
corruption
corruption esakal
Updated on

Nashik News : कोरोनामुळे विस्कळित झालेल्या शैक्षणिक क्षेत्राचे वेळापत्रक यंदाच्‍या वर्षात सुरळीत झाल्‍याने लाखो विद्यार्थी, पालकांना दिलासा मिळाला आहे. सीईटी परीक्षा वेळेवर पार पडण्यापासून वेळीच प्रवेश प्रक्रिया राबविल्‍याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे.

दुसरीकडे स्‍पर्धा परीक्षांचे वेळापत्रकदेखील पूर्वपदावर येत असताना सरकारी नोकरीच्‍या प्रतीक्षेत असलेल्‍या उमेदवारांच्‍या आशा पल्‍लवीत झाल्‍या आहेत. परंतु यंदाच्‍या वर्षात तलाठी भरतीसह इतर परीक्षांमधील पेपरफुटीच्‍या सक्रिय रॅकेटची पाळेमुळे नाशिकला सापडली.

शिक्षण विभागातील भ्रष्टाचार अन्‌ अधिकाऱ्यांकडील कोट्यवधींची माया यामुळेदेखील नाशिकची राज्‍यभर चर्चा झाली.- अरुण मलाणी (Nashik is talk of state due to paper racket corruption nashik recap 2023 news)

विविध कारणांनी रखडलेल्या स्‍पर्धा परीक्षा व सरकारी नोकरीच्‍या प्रतीक्षेत असलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांकडून मेगा भरतीचे स्वप्न यंदाच्‍या वर्षी अपूर्णच राहिले. दिलासा तर नाही पण पेपरफुटीच्‍या घटनांनी उमेदवारांना मनस्‍ताप नक्‍कीच वाढविला. ऑगस्‍टमध्ये घेतलेल्‍या तलाठी भरतीच्‍या ऑनलाइन परीक्षेत पहिल्‍याच दिवशी नाशिक केंद्रावर गैरप्रकार उघडकीस आला होता.

म्हसरूळ परिसरातील केंद्राबाहेरून संशयित तरुणाला वॉकी-टॉकी, दोन मोबाईल फोन, टॅब आणि हेडफोनसह पोलिसांनी ताब्‍यात घेतले होते. हे प्रकरण थेट विधिमंडळातही गाजले. या प्रकरणातील संशयित इतरही विविध परीक्षांच्‍या पेपरफुटीच्‍या घटनांमध्ये सहभागी असल्‍याचा संशय व्‍यक्‍त करण्यात आला होता.

परंतु आता वर्ष संपत असताना पेपर फुटीचे संपूर्ण प्रकरण थंडावले आहे. राज्‍यभर विस्‍तार असलेल्‍या महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाच्‍या हिवाळी सत्र परीक्षेतही एका विषयाचा पेपर फुटल्‍याचे आढळून आले. मात्र विद्यापीठाने तातडीच्‍या उपाययोजना करत पेपर रद्द करून सुधारित तारखेला परीक्षा घेतली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या एमबीए अभ्यासक्रमाचाही एका विषयाचा पेपर फुटल्‍याने सुधारित तारखेला परीक्षा घेण्याचे विद्यापीठाने जाहीर केले. दरम्‍यान निलंबित मुख्याध्यापकाला कामावर रुजू करण्यासाठीचे पत्र देण्याच्‍या मोबदल्‍यात लाचेची मागणी करणाऱ्या महापालिका शिक्षण विभागातील प्रशासनाधिकारी सुनीता धनगर व लिपिक नितीन जोशी यांना पन्नास हजार रुपयांची लाच घेताना अटक केले होते.

corruption
Nashik Political News: भाजपने शिवसेना फोडली : कोंडाजीमामा आव्हाड

यानंतर चौकशीदरम्‍यान अधिकाऱ्यांकडे आढळून आलेली माया पाहून सर्वांचेच डोळे चक्रावले होते. शिक्षण विभागातील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्‍थित झाल्‍याने, भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्‍या जबाबदार्यांवर नियुक्‍त्‍या न देण्याबाबत घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नाशिक दौऱ्यावर असताना केली.

प्रत्‍यक्षात मात्र अन्‍य विविध तक्रारींमध्ये चौकशी सुरू असलेल्‍या अधिकाऱ्यांच्या विविध पदांवर नियुक्‍त्‍या झाल्‍याने ही घोषणा हवेतच विरल्‍याचा कटू अनुभव आला. वर्ष सरण्याच्‍या काही दिवसांपूर्वीच मोठ्या शैक्षणिक संस्‍थेच्‍या पदाधिकाऱ्यांसह जिल्‍हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्‍यावरील कारवाई चर्चेचा विषय ठरली. दरम्‍यान शिक्षण विभागातील महत्त्वाच्‍या पदांवर वर्षभर प्रभारींचेच राज्‍य राहिल्‍याचे बघायला मिळाले.

नाशिक उपकेंद्राची उभारणी सुरू; सहायक कुलसचिवांची प्रतीक्षा कायम

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या नाशिक उपकेंद्राच्‍या उभारणीला यंदाच्‍या वर्षी मुहूर्त लागला असून, सुसज्‍ज इमारतीचे काम अंतिम टप्यांत आले आहे. नाशिकच्‍या अनुषंगाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. यामध्ये सहायक कुलसचिवांच्‍या नियुक्‍तीचा निर्णय तडीस गेला असला तरी निवड प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्‍याने वर्ष सरतांनाही सहायक कुलसचिवांची प्रतीक्षा कायम आहे.

पीआरएन क्रमांक खुला करण्याच्‍या निर्णयाने अर्धवट शिक्षण राहिलेल्‍या अनेक विद्यार्थ्यांना पदवी, पदव्‍युत्तर पदवी पूर्ण करण्याची संधी मिळालेली आहे. पूर्णवेळ कुलगुरू, प्र- कुलगुरू यांच्‍या नियुक्‍तीमुळे यंदाच्‍या वर्षी विद्यापीठाचे कामकाज गतिमान होण्यास मदत झाली आहे.

corruption
Nashik News: नववीच्या मुलीने उचलले टोकाचे पाऊल

‘मुक्‍त’ विद्यापीठात बदलांची नांदी

प्रदीर्घ काळापासून प्रभारींकडे जबाबदारी असलेल्‍या यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाला डॉ. संजीव सोनवणे यांच्‍या रूपाने पूर्णवेळ कुलगुरू यंदा लाभले. त्यांनी पदभार स्‍वीकारताच विद्यापीठात बदलांची नांदी सुरू केली असून, पदव्‍युत्तर पदवी स्‍तरावरील अभ्यासक्रमांची पुनर्रचना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्‍या अनुषंगाने केली आहे.

गरजेनुरूप अभ्यासक्रम उपलब्‍ध करून देताना विद्यार्थ्यांना कौशल्‍याधीष्ठीत शिक्षण देण्यावर भर दिला जातो आहे. परीक्षेनंतर ३० दिवसांच्‍या आत निकाल जाहीर करणारे विद्यापीठ म्‍हणून ‘मुक्‍त’ला बहुमान मिळवून दिला.

विद्यापीठाला प्रा. जोगेंद्रसिंग बिसेन यांच्‍या रूपाने प्र- कुलगुरूदेखील या वर्षात मिळाले. दरम्‍यान पीएच.डी केंद्राच्‍या विषयापासून इतर विविध महत्त्वाचे विषय वर्षअखेरीसही पूर्णत्वास जाऊ शकले नाही.

व्हीजन डॉक्‍युमेंटचा ‘आरोग्य’मध्ये अवलंब

कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर यांनी जारी केलेल्‍या व्हीजन डॉक्‍युमेंटच्‍या अनुषंगाने महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठातही अनेक बदल झाले. विद्यापीठ प्रांगण ग्रीन कॅम्‍पस करण्यापासून अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती आदींमध्ये सकारात्‍मक बदल घडविताना, विद्यार्थीभुख कारभार विद्यापीठाचा राहिला.

corruption
Nashik News: निधी वाटपावरून आमदार अन् प्रशासनात संघर्ष; मोठे रस्ते कामासाठी निधी खर्चाचे नियोजन

विद्यापीठातर्फे आयोजित कै.दौलतराव आहेर स्‍मृती व्‍याख्यानमालेसह इतर विविध व्‍याख्याने, चर्चासत्रे विविध घटकांसाठी मार्गदर्शक ठरलेली आहेत. मात्र वर्ष सरत असताना अंतिम काही महिन्‍यांमध्ये समोर आलेला पावती घोटाळा, आरोग्याच्या भरती प्रक्रियेत म्‍हाडा परीक्षा पेपरफुटीतील संशयितांचा सहभाग तसेच जिल्‍हा शासकीय रुग्‍णालयाच्‍या आवारातील पदव्‍युत्तर पदवी महाविद्यालयाच्‍या अधिष्ठातापदावरील नियुक्‍तीचा वाद चर्चेचे विषय ठरले.

‘मविप्र’चे विस्‍ताराचे धोरण

परिवर्तनानंतर नूतन कार्यकारिणीने वर्षपूर्तीनिमित्त या वर्षी सप्‍टेंबरमध्ये पत्रकार परिषद घेत मराठा विद्या प्रसारक समाज संस्‍थेचा आढावा सादर केला होता. मविप्र विद्यापीठाची स्‍थापना, डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालया रुग्‍णालयाचे विस्‍तारीकरण, संस्‍थेतर्फे गंगापूर रोडवरील वाहनतळाच्‍या जागेवर सभागृह व बहुमजली इमारत उभारणी असे विकासाचे अन्‌ विस्‍ताराचे धोरण सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी मांडले.

गेल्‍या वर्षी निवडणुकीदरम्‍यान संस्‍थेवरील कर्जाचा मुद्दा गाजलेला असताना वर्षपूर्तीनिमित्त कर्जाचा तपशीलदेखील त्‍यांनी मांडला. २९ कोटींचे कर्ज फेडताना, ३१ कोटींच्‍या देणी अदा केल्‍याचे त्‍यांनी जाहीर केले होते. नुकताच पुस्‍तकांची रांगोळीचा विश्‍वविक्रमी उपक्रम संस्‍थेतर्फे राबविण्यात आला. दोन लाखाहून अधिक विद्यार्थी संख्या असलेल्‍या या संस्‍थेने वर्षभरात शैक्षणिक, सांस्‍कृतिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रात भरीव कामगिरीची नोंद केली आहे.

मार्गदर्शक हरपले...

शैक्षणिक क्षेत्रातील ज्‍येष्ठांच्‍या निधनाने त्‍यांच्‍या मार्गदर्शनापासून मुकावे लागणार आहे. ज्‍येष्ठ शिक्षणतज्‍ज्ञ तसेच यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाचे संस्‍थापक कुलगुरू डॉ.राम ताकवले यांचे मे महिन्‍यात निधन झाले. विद्यापीठास त्‍यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत होते. गोखले एज्‍युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी, नाशिक एज्‍युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर यांच्‍या निधनाने शैक्षणिक क्षेत्रातील मोठी हानी झाली असून, मार्गदर्शक हरपल्‍याची भावना नाशिककरांच्‍या मनात आहे.

corruption
Nashik News : शहरापेक्षा दिंडोरी, कळवणला महिला मतदारांची प्रमाण जास्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()