Senior Women T-20 Cricket : वरिष्ठ महिला क्रिकेट संघात ईश्वरी, तेजस्विनी! टी-ट्वेंटी स्पर्धेत करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

Latest Cricket News : ईश्वरी, तेजस्विनीने यापूर्वीदेखील महाराष्ट्रातर्फे वरिष्ठ व एकोणीस वर्षांखालील तसेच विविध वयोगटात महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
Ishwari Savkar & tejaswini batwal
Ishwari Savkar & tejaswini batwalesakal
Updated on

नाशिक : येथील ईश्वरी सावकार व तेजस्विनी बाटवाल या दोन क्रिकेटपटूंची वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) तर्फे आयोजित कोलकता येथील वरिष्ठ महिला टी- ट्वेंटी स्पर्धेत या दोन्‍ही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ईश्वरी, तेजस्विनीने यापूर्वीदेखील महाराष्ट्रातर्फे वरिष्ठ व एकोणीस वर्षांखालील तसेच विविध वयोगटात महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. (Ishwari Tejaswini in senior women cricket team)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.