Nashik IT Raid : दोन महिन्यापूर्वी शहरात बांधकाम व्यावसायिकांवर छापे पडल्यानंतर त्याचीच पुनरावृत्ती आज घडली. बोगस ट्रेडिंग झाल्याच्या संशयावरून आज बांधकाम व्यावसायिकांसह चार्टर्ड अकाउंटच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले.
बारा ठिकाणी छापे टाकण्यात आल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात चारच ठिकाणी छापे टाकण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. (nashik it raid Income Tax Department raids again to probe fraud trading news)
नाशिकमधील बांधकाम व्यवसायांमध्ये काही आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांचा पैसा मोठ्या प्रमाणात आल्याच्या संशयावरून दोन महिन्यापूर्वी आयकर विभागाने शहरात मोठ्या प्रमाणात धाडसत्र अवलंबिले.
यात मोठ्या बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयांवर छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
याच छाप्यांतून प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने बोगस ट्रेडिंग झाल्याचा संशय व्यक्त करत आज पुन्हा काही बांधकाम व्यावसायिक व चार्टर्ड अकाउंटच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले.
यातून देखील काही महत्त्वाची माहिती समोर आली असून त्याच अनुषंगाने शहरात पुन्हा धाडसत्र अवलंबिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बोगस ट्रेडिंगच्या माध्यमातून जमिनी व शैक्षणिक संस्थांचे व्यवहार झाल्याचे बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.