Nashik News : इटलीच्या दांपत्याचे दत्तक विधान पूर्ण! आधाराश्रमातील चिमुरडीला मिळाले हक्काचे घर अन पालकही

Nashik News : समाजाकडून उपेक्षा झालेल्या व बालकल्याण समितीच्या मध्यस्थीने घारपुरे घाटातील आधाराश्रमातील चिमुरडीला आज हक्काच्या घराबरोबरच पालकही मिळाले
Adoption News
Adoption Newsesakal
Updated on

नाशिक : समाजाकडून उपेक्षा झालेल्या व बालकल्याण समितीच्या मध्यस्थीने घारपुरे घाटातील आधाराश्रमातील चिमुरडीला आज हक्काच्या घराबरोबरच पालकही मिळाले. या हृद्य सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून या चिमुरडीवर यशस्वी शस्त्रक्रिया केलेले मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. संजय वेखंडे यांच्यासह तिला दत्तक घेणारे पालक, संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Nashik Italian couple adoption little girl marathi news)

बालकल्याण समितीमार्फत आधाराश्रमात एक महिन्याची असताना दाखल झालेल्या या चिमुरडीला मेंदूविषयक आजार होता. त्यामुळे तिच्यावर तातडीच्या शस्त्रक्रियेची गरज होती. शहरातील प्रसिद्ध मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. संजय वेखंडे यांनी तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यावर हळूहळू तिच्यात सुधारणा होत गेली व आज हा दत्तक विधी पार पडला.

दत्तक घेणाऱ्या या पालकांचे नाव फॅबिओ मॅफेंझीनी व मरियाना रॅम्पीनी आहे. यावेळी संस्थेचे डॉ. अनुराधा दशपुत्रे, सचिव हेमंत पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, सदस्य प्रभाकर केळकर, नितीन वैद्य, मिलिंद कचोळे, नितीन केळकर, कल्याणी दातार आदी उपस्थित होते. (latest marathi news)

Adoption News
Nashik News : नाशिक उपकेंद्रासाठी 13 कोटींचा निधी! पायाभूत सुविधांच्‍या उभारणीला मिळणार गती

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची तत्परता

या मुलीला जन्मत:च हायड्रोसेफालिस हा मेंदूविषयक आजार असल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया आवश्‍यक होती. डॉ. वेखंडे यांनी सवलतीच्या दरात म्हणजे एक लाख रूपयांत ही शस्त्रक्रिया करण्याची तयारी दर्शविली. पैशाची जमवाजमव सुरू असतानाच डॉ. वेखंडे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी संपर्क करण्याबाबत सुचविले.

हे प्रयत्न सुरू झाल्यावर अत्यंत तातडीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयातून मदतीच्या धनादेशाबाबत फोन आल्यावर सर्वांना आश्‍चर्याचा धक्काच बसला. अत्यंत कमी वेळात मुख्यमंत्री सहायता निधीतून ही मदत प्राप्त झाली. विशेष म्हणजे त्यासाठी मुंबईला न जाता नाशिकमध्येच हा धनादेश प्राप्त झाला. त्यामुळे पुढील प्रक्रियाही कमी वेळात पार पडल्या.

"शासन चांगल्या कामांबाबत सकारात्मक आहे, फक्त त्यासाठी प्रामाणिक व सातत्याने पाठपुरावा केल्यास कमी वेळेत मदत मिळू शकते, हे या तातडीच्या मदतीमुळे लक्षात आले. यापुढेही शासनाने असेच सहकार्य करावे."

- राहुल जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी, आधाराश्रम, नाशिक

Adoption News
Nashik News : एप्रिलपासून कटिंग- दाढी दर 180 रुपये! दिव्य नाभिक सामाजिक संस्थेच्या सभेत निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()