Kojagiri Pournima: बुधवारी आदिमायेच्या दरबारात कोजागिरीचा जागर! राज्यातील मोठ्या कावड यात्रेसाठी हजारो कावडीधारक सीमेवर

Latest Nashik News : राज्यासह मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात राज्यातील हजारो कावडीधारक विविध नद्यांचे पवित्र जल (तीर्थ) घेऊन जिल्ह्याच्या सीमेपर्यंत दाखल झाले आहेत.
saptashrungi Devi
saptashrungi Deviesakal
Updated on

वणी : स्वयंभू आद्य शक्तिपीठ सप्तश्रृंगी गडावर कोजागरी पौर्णिमा उत्सव असल्याने राज्यातील प्रमुख मोठ्या कावड यात्रा बुधवार (ता.१६) होत आहे. याच दिवशी तृतीय पंथीयांची (किन्नर समुदाय ) छबिना मिरवणूक होणार आहे. दरम्यान राज्यासह मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात राज्यातील हजारो कावडीधारक विविध नद्यांचे पवित्र जल (तीर्थ) घेऊन जिल्ह्याच्या सीमेपर्यंत दाखल झाले आहेत. (Jagar of Kojagiri at saptashrungi devi mandir on Wednesday)

कावडधारक भाविकांची संख्या लाखाच्यावर असते, त्यात हजारो पुणे (मुळा नदी), साक्री, पिंपळनेर, शहादा, असलोद या ठिकाणाहून (तापी), ओंकारेश्वर, इंदूर येथून (नर्मदा) , उज्जैन येथून (क्षिप्रा) , भीमाशंकर (भीमा) नदीचे पाणी घेउन चारशे ते सहाशे किमी अंतरावरून अनवाणी प्रवास करून गडापासून सुमारे दीडशे ते दोनशे किमी अंतरापर्यंत कावडीधारक दाखल झाले आहे.

दिंडोरी तालुक्यासह जिल्हाभरातून हजारो कावडीधारक रात्री उशिरापर्यंत त्रंबकेश्वर येथे रवाना झाले. नाशिक येथून रामकुंडातूनही गोदावरीचे हजारो कावडीधारक सोमवार व मंगळवार गोदावरीचे जल घेऊन गडाकडे कूच करतील.

होणारे कार्यक्रम

बुधवार, ता. अश्विन शु. १४ (पौर्णिमा प्रारंभ रात्री ८.४१) सकाळी १० ते रात्री ८.३० पर्यंत कावडीधारकांनी आणलेले जल श्री भगवती मंदिरात स्वीकारले जाईल. श्री. भगवतीचा रात्री ९ ते १२ पासून जलाभिषेक पंचामृत महापूजा होईल. गुरुवार (ता. १७) देवी पंचामृत महापूजा (पौर्णिमा समाप्ती दुपारी ४.५६ वा.) शुक्रवारी (ता. १८) रात्री साडे सातला शांतीपाठ व महाप्रसाद होईल. (latest marathi news)

saptashrungi Devi
Mukesh Ambani: मुकेश अंबानी बॉलीवूडवरही करणार राज्य; करण जोहरची कंपनी घेणार विकत, काय आहे पुढचा प्लॅन?

...तर गडाचा रस्ता बंद

सप्तश्रृंगी देवी न्यास, ग्रामपंचायत यंत्रणा कावड यात्रेसाठी सज्ज आहे. बुधवार, (ता.१६) गुरुवारी नांदुरी - सप्तश्रृंगी गड रस्ता खासगी वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहे. महामंडळानेही नवरात्राप्रमाणेच नांदुरी ते सप्तश्रृंगी गड या दरम्यान १३० बस तर नाशिक विभागातून १६५ बसचे नियोजन आहे.

कावडी धारकांसाठी विसावा, पाणी व फराळ वाटपाबरोबरच वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाशिक ते वणी, मालेगाव, पिंपळनेर, सटाणा, कळवण या रस्त्यांवर अनेक स्वयंसेवी संस्थानी तयारी सुरु केली आहे. शुक्रवार (ता. १८) ऑक्टोबरला रात्री साडे सातला महाप्रसादाने उत्सवाची सांगता होणार आहे.

saptashrungi Devi
Nashik Hajj Yatra Applications : हज यात्रेसाठी जिल्ह्यातून बाराशे अर्ज! शहरातून 400 तर राज्यातून 23 हजार भाविकांची नोंदणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.