Jal Jeevan Mission : शाश्वत पाणीपुरवठासाठी कर वसुली गरजेची : डॉ. अर्जुन गुंडे

Jal Jeevan Mission : जलजीवन मिशन व माझी वसुंधरा अभियान या दोन्ही योजना लोकसहभागाच्या असून यामध्ये लोकांचा सहभाग आवश्यक आहे.
Officials, employees attended the workshop organized under Majhi Vasundhara Abhiyan and Jaljeevan Mission on behalf of Water and Sanitation Department of Zilla Parishad.
Officials, employees attended the workshop organized under Majhi Vasundhara Abhiyan and Jaljeevan Mission on behalf of Water and Sanitation Department of Zilla Parishad.esakal
Updated on

Jal Jeevan Mission : जलजीवन मिशन व माझी वसुंधरा अभियान या दोन्ही योजना लोकसहभागाच्या असून यामध्ये लोकांचा सहभाग आवश्यक आहे. शाश्वत पाणी पुरवठा करणेसाठी नियमित पाणीपट्टी वसुली होणे आवश्यक आहे. यासाठी महिला बचत गटांकडून पाणीपट्टी वसुलीसारखा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी केले. (nashik Jal Jeevan Mission Dr Arjun Gunde statement of Tax collection marathi news)

जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाच्यावतीने माझी वसुंधरा अभियान व जलजीवन मिशन अंतर्गत बुधवारी (ता.१३) कॉलेज रोड जवळील गुरुदक्षिणा सभागृहात जिल्हास्तरीय कार्यशाळा झाली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक दीपक पाटील आदी उपस्थित होते.

डॉ. गुंडे पुढे म्हणाले की, पूर्ण झालेली पाणी पुरवठा योजना ताब्यात घेताना गावाने सर्व माहिती घेऊन व खात्री करूनच योजना ताब्यात घ्यावी. तसेच किमान एक महिना ठेकेदाराकरून योजनेची पूर्व चाचणी करून घ्यावी, पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना सर्व घटकांबाबत अवगत करावे, पाणीपुरवठा योजना पूर्ण होत असताना त्यासाठी किती पाणीपट्टी लागणार आहे याचाही अभ्यास करणे आवश्यक आहे. (latest marathi news)

Officials, employees attended the workshop organized under Majhi Vasundhara Abhiyan and Jaljeevan Mission on behalf of Water and Sanitation Department of Zilla Parishad.
Jal Jeevan Mission : जिल्ह्यातील एक लाख 20 हजार नळजोडणीचे काम अपूर्ण; 3 महिन्यात करावे लागणार उद्दिष्टे पूर्ण

प्रास्ताविकात प्रकल्प संचालक दीपक पाटील यांनी जलजीवन मिशन व माझी वसुंधरा अभियान याबाबत तसेच कार्यशाळेच्या आयोजनाबाबत माहिती दिली. कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी जलजीवन मिशनच्या कामाबाबत माहिती दिली. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात घेण्यात आलेल्या निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेतील विजयी स्पर्धेकांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यशाळेला जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग उपअभियंता, शाखा अभियंता, सरपंच, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, डेटा ऍन्ट्री ऑपरेटर, ग्राम स्वच्छता समिती सदस्य उपस्थित होते.

दस्तऐवजबाबत सविस्तर मार्गदर्शन

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री यांच्या हस्ते झालेल्या 'महाजल समाधान' पोर्टल प्रणाली अंतर्गत ॲप व ऑनलाइन पोर्टलचा उद्घाटन सोहळा दूरदृश्य माध्यमातून दाखविण्यात आला. विभागीय आयुक्त कार्यालयातील तांत्रिक समन्वयक शिवाजी सांगळे यांनी माझी वसुंधरा अभियानाबाबत माहिती देताना दस्तऐवज कसे तयार करावे, माहिती कशी भरावी याबाबत सविस्तर मार्गदर्शक केले. श्रीकांत सोनवणे यांनी जल संधारण, देखभाल दुरुस्ती पाणी बचत, पाण्याविषयी जनजागृती याबाबत मार्गदर्शक केले.

Officials, employees attended the workshop organized under Majhi Vasundhara Abhiyan and Jaljeevan Mission on behalf of Water and Sanitation Department of Zilla Parishad.
Jal Jeevan Mission : ‘जलजीवन’च्या कामांना 6 महिन्यांची मुदतवाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.