Nashik Jal Jeevan Mission : शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील नागरिकांना वैयक्तिक घरगुती नळजोडणीद्वारे सुरक्षित पुरेसे व गुणवत्तापूर्ण पाणी देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशनचा नाशिक जिल्ह्यात फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. त्यातही पेठ, चांदवड व इगतपुरी या तालुक्यांमध्ये तर कामेच अर्धवट सोडून ठेकेदार फरारी झाल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. (Jal Jeevan Yojana problem in district)
ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने योजना अमलात आणली आहे. २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना वैयक्तिक घरगुती नळजोडणीद्वारे सुरक्षित व पुरेसे पाणी देण्याची ही योजना आहे. प्रतिव्यक्ती ५५ लिटर शुद्ध पाणीपुरवठ्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून ग्रामीण भागात योजना राबविली जात आहे. १ जानेवारी २०२३ ला योजनेचा प्रारंभ नाशिक जिल्ह्यात झाला.
३० जून २०२४ पर्यंत योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते, मात्र तीन महिने उलटत आले असताना जलजीवन मिशनचे काम अर्धवट असल्याने केंद्र सरकारच्या ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्याच्या योजनेला हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. जलजीवन मिशनसाठी जिल्ह्याला १४१ कोटी रुपये खर्च मंजूर करण्यात आला. त्यापैकी जवळपास ७६ कोटी रुपये खर्च झाला असून, ३७ टक्के रक्कम अखर्चित आहे.
"जलजीवन मिशनअंतर्गत शिल्लक कामे डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. वर्षभरात ज्या कामांमध्ये त्रुटी अथवा समस्या आढळल्या असतील त्याची नियमानुसार चौकशी करू."
-गंगाधर निवडंगे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद
जलजीवन योजनेची स्थिती
तालुका योजना अपूर्ण
पेठ ८५ ४०
चांदवड ७४ ३९
त्र्यंबकेश्वर ८५ ४४
सिन्नर ८० ३९
कळवण १२७ ४४
सुरगाणा १६४ ७५
देवळा ३३ १०
नाशिक ५५ १३
दिंडोरी १०४ ३१
मालेगाव ५५ १२
इगतपुरी ९१ ३५
बागलाण ११२ ५२
निफाड ९५ १०
येवला ३६ १३
नांदगाव २६ ०२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.