Nashik News : सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवताना त्यांना कुठल्या प्रकारची वागणूक आपण देतो, यावर महसूल विभागाची प्रतिमा अवलंबून असते. महसूल विभागाची प्रतिमा दिवसेंदिवस वाढत असून याची प्रचिती आपल्याला दरवर्षी विविध पदांसाठी होणाऱ्या स्पर्धा परीक्षांमधील वाढत्या इच्छुकांच्या संख्येवरून लक्षात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले. जिल्हा नियोजन भवनात मंगळवारी (ता.२०) महसूल पंधरवड्याची सांगता झाली. (Revenue Image on Behavior of Officers Employees )