Nashik Heavy Rain : जळगाव नेऊरचा बंधारा गेला वाहून! चार वर्षांनंतर गाय, देशमानेची गोई नद्या खळाळल्या

Latest Nashik News : नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांच्या घरापर्यंत पाणी लागले होते. पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने लोकवर्गणीतून साकारलेला मातीचा बंधारा वाहून गेला.
Due to the return rains, the embankment on the Guy River of Jalgaon Neur was washed away.
Due to the return rains, the embankment on the Guy River of Jalgaon Neur was washed away.esakal
Updated on

जळगाव नेऊर : जळगाव नेऊर (ता. येवला) येथील गाय नदीवर लोकवर्गणीतून साकारलेला मातीचा बंधारा महिन्याभरापूर्वी पालखेडच्या ओव्हरफ्लो पाण्याने पूर्ण क्षमतेसह भरलेला होता. मात्र परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नदीच्या पाणीपातळीत सोमवार (ता. २१) रात्री आठ ते नऊच्या दरम्यान अचानक वाढ होऊन जळगाव नेऊर येथील गाय नदी ओसंडून वाहिली. नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांच्या घरापर्यंत पाणी लागले होते. पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने लोकवर्गणीतून साकारलेला मातीचा बंधारा वाहून गेला. (Jalgaon Neur dam washed away)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.