Nashik | येवल्याचे सुपुत्र जवान नारायण मढवई यांना हिसार येथे वीरमरण

nashik Jawan Narayan Madhawai of Yeola died at Hisar dies in accident in hisar
nashik Jawan Narayan Madhawai of Yeola died at Hisar dies in accident in hisar
Updated on

चिचोंडी (जि. नाशिक) : चिचोंडी बुद्रुक (ता.येवला) येथील भारतीय सैन्यात आरमाड विभागातील जवान नारायण निवृत्ती मढवई (वय ३९) यांना हिसार (हरियाणा) येथे कर्तव्यावर असताना वीरमरण प्राप्त झाले.

येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक हे गाव सैनिकांचे गाव म्हणून नावारुपास आलेले असून गावातील सर्वात पहिले भारतीय सैन्य दलातील जवान म्हणून नारायण मढवई यांचे नाव आहे. गुरुवार (दि.१०) रोजी रात्री आपल्या कर्तव्य बजावून तेथील आपल्या निवासाकडे बाईकवर निघाले असताना त्यांच्या गाडीची व टॅंकची (रणगाडा) धडक बसल्याने त्यांना वीरमरण आल्याची माहिती कुटूंबियांनी दिली आहे.

आज शुक्रवार (दि. ११) रोजी सकाळी सात वाजेला त्यांना वीरमरण आल्याची बातमी गावात पसरली आणि गावासह येवला तालुक्यात शोककळा पसरली. २९ जानेवारी २००३ मध्ये सैन्यात भरती झालेले नारायण मढवई हे गावातील पहिले सैनिक होते. त्यांच्या पच्छात शेतकरी वडील निवृत्ती मढवई, आई ताराबाई, पत्नी सोनाली (वय३३), मुलगा कृष्णा (वय १३), हरीश (वय १०) भाऊ बाळासाहेब, भाऊसाहेब असा मोठा परिवार आहे.

nashik Jawan Narayan Madhawai of Yeola died at Hisar dies in accident in hisar
प्रेमप्रकरणातून तरुणीने युवकास जिंवत जाळले, नाशिक जिल्ह्यात खळबळ

शेतकरी कुटुंबातील मनमिळावू स्वभावाने परिचित असलेले नारायण मढवई यांच्या शहीद होण्याची बातमी गावात कळताच गावावर शोककळा पसरली. गावात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह साठी उभारलेला मंडप खाली उतरवून घेण्यात आला. दरम्यान प्रशासनाने नारायण मढवई यांचे पार्थिव शनिवार (दि. १२) सकाळी येवला तालुक्यात येणार असून शासकीय इतमामात उद्या शनिवार (दि. १२) रोजी त्यांच्या निवासस्थानी शेतातच अंत्यविधी करण्यात येणार आहे. तहसीलदार प्रमोद हिले यांनी मेजर नारायण मढवई यांच्या मृत्यूबाबत सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून खुलासा केला जाईल असे म्हटले. वीर मरण प्राप्त झालेले जवान नारायण मढवई हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई यांचे पुतणे होते.

nashik Jawan Narayan Madhawai of Yeola died at Hisar dies in accident in hisar
नाशिक : रस्ता ओलांडत असलेल्या युवतीला एसटी बसने चिरडले!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.