नाशिक : मेंढीगिरी समितीच्या अहवालातील शिफारशी कालबाह्य झाल्याने जायकवाडीच्या वरच्या धरणातून पाणी सोडू नये, या संदर्भात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने गोदावरी अभ्यास गटाला चार आठवड्यांत नवीन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणामध्ये पाणी कमी असल्यास किंवा पाऊस कमी झाल्यास वरच्या धरणातून अर्थात नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडावे, असा अहवाल मेंढीगिरी समितीने दिला आहे. ()