Nashik News : ‘जेएनपीए’चे शैक्षणिक संस्‍थांना बळ; ‘सीएसआर’ निधीतून सीएचएमईला 50 लाख

Nashik : जवाहरलाल नेहरू पोर्ट ॲथॉरिटी (जेएनपीए) यांच्‍यातर्फे नाशिकमधील शैक्षणिक संस्‍थांना आर्थिक बळ दिले आहे.
JNPA's Strength to Educational Institutions
JNPA's Strength to Educational Institutionsesakal
Updated on

Nashik News : जवाहरलाल नेहरू पोर्ट ॲथॉरिटी (जेएनपीए) यांच्‍यातर्फे नाशिकमधील शैक्षणिक संस्‍थांना आर्थिक बळ दिले आहे. सीएसआर निधीतून शहरातील दोन संस्‍थांना भरघोस सहाय्यता केली आहे. यामध्ये सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्‍युकेशन सोसायटीला ५० लाख, तर मराठा विद्याप्रसारक समाज संस्‍थेला ३८ लाख १७ हजार ५०० रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. ( JNPH strength to educational institutions 50 lakhs to CSR fund )

मुंबई ः सामाजिक दायित्व निधीतून हरित परिसरासाठी सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्‍या पदाधिकाऱ्यांना ५० लाखांचा धनादेश सुपूर्द करताना जेएनपीचे संचालक उन्मेष वाघ.

हरित, पर्यावरणपूरक प्रांगणासाठी ‘सीएचएमईएस’ला मदतीचा हात

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीने वृक्षवेल्लींनी नटलेल्या भोसला शैक्षणिक संकुलाला अधिक हरित, जैवविविधता व पर्यावरणपूरक बनविण्यासाठी ‘जेएनपीए’ने सामाजिक दायित्वाच्या भावनेतून संस्थेस ५० लाखांची मदत दिली. उभयतांमध्ये सोमवारी (ता. ५) तसा करार झाला. मदतीमुळे काम अधिक वेगाने मार्गी लागेल, असा विश्वास संस्था पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

भोसलाचे १६५ एकरचे शैक्षणिक संकुल असून, विद्यार्थ्यांना निसर्गांच्या सानिध्यात शिक्षणाची अनुभूती येण्यासाठी संस्थेतर्फे झाडे जतन करण्याचा, हिरवळ वाढविण्याचा प्रयत्‍न राहिला आहे. विविध दिनविशेषांना वृक्षारोपण मोहीम राबविली जाते. भोसला महाविद्यालयाने नुकताच राममंदिराच्या परिसरात दोनशे फळे-फुलांच्या झाडांचे रोपण केले. उपक्रमांसाठी संस्थेने अंदाजपत्रकात भरीव तरतूद केली आहे. (latest marathi news)

JNPA's Strength to Educational Institutions
Nashik News : वर्दळीची ठिकाणं ‘टोईंग’ला नकोशी सोयीच्या रस्त्यांवरच वाहनांची होते टोईंग

सीएचएमई आणि जेएनपीए यांच्‍यातील करारामुळे काम अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी जेएनपीएचे संचालक उन्मेष वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांनी संस्थेचे सरकार्यवाह सीएमए हेमंत देशपांडे यांच्याकडे ५० लाखांचा धनादेश सुपूर्द केला. जेएनपीएच्या प्रशासकीय सरव्यवस्थापक मनीषा जाधव, अध्यक्ष सुबोध आव्हाड, सीएसआर सल्‍लागार सिद्धार्थ उघाडे, संस्थेचे सहकार्यवाह माधव बर्वे, नाशिक विभागाचे कोषाध्यक्ष राहुल वैद्य उपस्थित होते.

मुंबई ः जेएनपीएच्‍या अधिकारी वर्गाकडून सामाजिक दायित्व निधीचा धनादेश स्‍वीकारताना मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे.

शाळांतील मुलींचे प्रसाधनगृहांच्‍या दुरुस्‍तीसाठी मविप्रला सहाय्यता

मराठा विद्याप्रसारक समाज संस्‍थेच्‍या पाच शाळांतील मुलींच्‍या प्रसाधनगृहांची दुरुस्‍ती करण्यासाठी 'जेएनपीए'तर्फे सामाजिक दायित्‍व निधीतून ३८ लाख १७ हजार ५०० रुपयांचा निधी दिला आहे. यामुळे विद्यार्थिनींच्‍या आरोग्‍याचा संभाव्‍य धोका टळण्यास मदत होणार आहे. जेएनपीएच्‍या अधिकारी वर्गाकडून मविप्र संस्‍थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्‍यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्‍थित होते.

JNPA's Strength to Educational Institutions
Nashik News : अन्न व औषध विभागाकडून 2 लाखांची चहा पावडर जप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.