Nashik : MahaDBT पोर्टलवर शिष्यवृत्ती लाभासाठी राईट टू गिव्ह अप पर्यायासाठी 30 जूनची मुदत

Nashik : आदिवासी विकास विभागाच्या विविध शिष्यवृत्तीचा लाभ देण्यासाठी शासनाकडून सन २०१८-१९ पासून महाडीबीटी पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
MahaDBT
MahaDBTesakal
Updated on

Nashik : आदिवासी विकास विभागांतर्गत तालुक्यातील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या विविध शिष्यवृत्तीचा लाभ देण्यासाठी शासनाकडून सन २०१८-१९ पासून महाडीबीटी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर राईट टू गिव्हअप पर्याय निवडलेल्या अर्जदारांना हा पर्याय पुन्हा निवड करण्याबाबत ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ( June 30 deadline for right to give up option for scholarship benefit on MahaDBT portal )

अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी अरुणकुमार जाधव यांनी सांगितले. आदिवासी विकास विभागाच्या नाशिक प्रकल्प कार्यालयांतर्गत नाशिक, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, निफाड, येवला, दिंडोरी, इगतपुरी आणि पेठ या तालुक्यातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या विविध शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येतो. (latest marathi news)

MahaDBT
MahaDBT Scholarship | महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्ती अर्ज तत्काळ काढायचे निकाली : सुंदरसिंग वसावे

महाडीबीटी पोर्टलवर संस्थेच्या प्रिसिंपल (Principal) लॉगिनमध्ये ही सुविधा ३० जूनपर्यंत उपलब्ध राहणार असून ज्या अर्जदार विद्यार्थ्यांनी राईट टू गिव्ह अप पर्याय निवडला असेल, अशांनी राईट टू गिव्ह अप पर्याय पुनर्निवडीसाठी संबंधित संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहनही पत्रकात करण्यात आले आहे.

MahaDBT
Nashik: MahaDBT पोर्टलवर अर्ज दाखल करण्यामध्ये विद्यार्थ्यांना अडचणी; शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची भीती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.