Junior Collage Admission : अकरावीच्‍या 66 टक्‍के जागा रिक्‍तच; दुसऱ्या फेरीत अवघ्या तेवीसशे विद्यार्थ्यांचा प्रवेश

Nashik News : इयत्ता अकरावीच्‍या ऑनलाइन केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेतील दुसऱ्या नियमित फेरीत अवघ्या दोन हजार ३७० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.
Admission
Admission esakal
Updated on

Nashik News : इयत्ता अकरावीच्‍या ऑनलाइन केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेतील दुसऱ्या नियमित फेरीत अवघ्या दोन हजार ३७० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. यातून आत्तापर्यंत प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या नऊ हजार ४७८ झाली आहे. अद्यापही रिक्‍त जागांची संख्या १८ हजार ५२२ असून, रिक्‍त जागांचे प्रमाण तब्‍बल ६६ टक्‍के आहे. तिसऱ्या फेरीसाठी नोंदणीची प्रक्रिया रविवार (ता. १४)पासून सुरू होत आहे. (Admission 66 percent of Class XI seats are vacant)

नाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रीभूत प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. याअंतर्गत दोन फेऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आत्तापर्यंत प्रवेशप्रक्रियेला विद्यार्थ्यांचा अत्‍यंत संथ प्रतिसाद मिळत असल्‍याचे आकडेवारीतून समोर येत आहे.

एकीकडे दहावीचा निकाल उंचावलेला असताना, दुसरीकडे अकरावीचा प्रवेश संथगतीने होत असल्‍याने संभ्रमावस्‍था निर्माण झालेली आहे. प्रवेश फेरीत निवडीच्‍या प्रक्रियेमुळे मुळात निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी राहाते असल्‍याचा अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे. (latest marathi news)

Admission
Nashik News : जोरदार पाऊस नसतानाही 3 वाडे कोसळले! अनेक वर्षापासून समस्या ‘जैसे थे’

तिसऱ्या नियमित फेरीची प्रक्रिया रविवार (ता. १४)पासून सुरू होत असून, पहिल्‍या टप्प्‍यात विद्यार्थ्यांना नोंदणी करून फेरीत सहभागी होता येणार आहे. तिसऱ्या फेरीत प्रवेशाला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष असणार आहे.

प्रवेशाची आकडेवारी दृष्टिक्षेपात

- फेरीतून प्रवेश घेतलेले विद्यार्थी --- आठ हजार ४२७

- इन-हाउस कोट्यातून प्रवेशित विद्यार्थी -- ६१२

- अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेशित विद्यार्थी --- ३६४

- व्‍यवस्‍थापन कोट्यातून प्रवेशित विद्यार्थी --- ७५

Admission
Nashik Police : शहर पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन! परिमंडळ दोनमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चेकिंग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.