Junior College Admission : अकरावीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांचा उत्साह मावळल्याची स्थिती आहे. दुसऱ्या विशेष फेरीच्या नोंदणीची मुदत शनिवारी (ता. १०) संपली. या फेरीमध्ये १ हजार ३८२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. दुसरीकडे १२ हजार ७२८ जागा अद्यापही रिक्त आहेत. दरम्यान दुसऱ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी मंगळवारी (ता. १३) प्रसिद्ध होईल. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शुक्रवार (ता.१६) पर्यंत मुदत असेल. (Only 1300 students participated in second special round )
अकरावी प्रवेशासाठी महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत याआधी तीन नियमित फेऱ्या आणि एक विशेष फेरी घेण्यात आली होती. पहिल्या नियमित फेरीला आणि पहिल्या विशेष फेरीला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून बहुतांश प्रवेश या दोन फेऱ्यांमध्येच झालेले आहेत.
अद्यापही ४० टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त असल्याने या जागांवर प्रवेशासाठी दुसऱ्या विशेष फेरीचे आयोजन केले होते. त्यासाठी विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग एक आणि भाग दोन भरण्याची संधी दिली होती. शनिवारी (ता. १०) सायंकाळी सहापर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. या फेरीला विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद मिळाला नसून, अवघ्या १ हजार ३८२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. (latest marathi news)
कोट्याच्या जागांसाठी उद्या निवड यादी
इनहाउस, व्यवस्थापन आणि अल्पसंख्याक या कोट्याच्या जागांवरही प्रवेश सुरु आहेत. या जागेवर प्रवेशासाठी दुसरी विशेष फेरी पार पडते आहे. रविवारी (ता. ११) महाविद्यालये कोटा पसंती दिलेल्या विद्यार्थ्यांची कोटानिहाय गुणवत्ता यादी तयार करतील. तर सोमवारी (ता.१२) प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी व प्रतीक्षा यादी महाविद्यालय स्तरावर प्रसिद्ध केली जाईल. या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शुक्रवार (ता.१६) पर्यंत मुदत असेल.
आकडेवारी दृष्टीक्षेपात..
महाविद्यालयांची एकूण प्रवेश क्षमता--- २८ हजार ४००
कॅप राउंडद्वारे उपलब्ध जागा-------------२५ हजार ०२०
प्रवेश फेरीतून आत्तापर्यंत प्रवेश संख्या----- १४ हजार २९०
कोट्याच्या जागांची एकूण प्रवेश क्षमता----- ३ हजार ३८०
कोट्या जागांवर आत्तापर्यंत झालेले प्रवेश-----१ हजार ३८२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.