Junior Collage Admission : विज्ञानचा कट-ऑफ@ 92.6 टक्‍के! साडेसोळा हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

Nashik News : इयत्ता अकरावीची पहिल्‍या फेरीची बहुप्रतीक्षित गुणवत्ता यादी गुरुवारी प्रसिद्ध झाली. अपेक्षेप्रमाणे पहिल्‍या यादीतील नामांकित महाविद्यालयांचा कट-ऑफ ९० टक्‍केपार राहिला.
Collage Admission
Collage Admissionesakal
Updated on

Nashik News : इयत्ता अकरावीची पहिल्‍या फेरीची बहुप्रतीक्षित गुणवत्ता यादी गुरुवारी (ता. २७) प्रसिद्ध झाली. अपेक्षेप्रमाणे पहिल्‍या यादीतील नामांकित महाविद्यालयांचा कट-ऑफ ९० टक्‍केपार राहिला. अनुदानित जागेसाठी आरवायके महाविद्यालयात विज्ञान शाखेचा कट-ऑफ ९२.६ टक्‍के लागला. वाणिज्‍य शाखेत बीवायके महाविद्यालयाचा कट-ऑफ ९०.८ टक्‍के राहिला. (Junior College Admission Science Cutoff 92 percent)

फेरीसाठी पात्रताधारक १६ हजार ४१४ पैकी १० हजार ८३१ विद्यार्थ्यांची निवड झाली असून, दुपारपर्यंत ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १ जुलैपर्यंत मुदत आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्‍यावर विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेशाची प्रतीक्षा होती. अकरावी प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असताना पहिल्‍या फेरीच्‍या निवड यादीची विद्यार्थी, पालकांना प्रतीक्षा लागून राहिली होती.

नियोजित वेळापत्रकानुसार गुरुवारी सकाळी दहाला यादी प्रसिद्ध झाली. या यादीत १० हजार ८३१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यादीच्‍या प्रसिद्धीनंतर विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्‍ध करून दिली होती. त्‍यानुसार दुपारपर्यंत ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्‍चित केले. यंदा दहावीचा निकाल उंचावलेला असल्‍याने कट-ऑफ वधारणार असल्‍याचा अंदाज व्‍यक्‍त केला जात होता. त्‍यानुसार नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी चुरस पाहायला मिळत आहे.

प्राधान्‍यक्रमनिहाय निवड झालेले विद्यार्थी

पहिले प्राधान्‍य- ७,४८८

दुसरे प्राधान्‍य- १,५१५

तिसरे प्राधान्‍य- ७७०

चौथे प्राधान्‍य- ४४०

पाचवे प्राधान्‍य- २६९ (latest marathi news)

Collage Admission
Nashik News : ब्रँडेड उत्पादकांकडून कीटकनाशकांचा वापर नाही; महाराष्ट्र मसाला उद्योग संघटनेचा दावा

आकडे बोलतात...

प्रवेशफेरीच्‍या जागा- २३,०८४

पात्र विद्यार्थी- १६,४१४

निवड झालेले विद्यार्थी- १०,८३१

शहरातील प्रमुख महाविद्यालयांतील

विज्ञान शाखेचा कट-ऑफ असा ः

(प्रवर्गनिहाय अनुदानित जागांसाठी)

महाविद्यालय एससी एसटी ओबीसी खुला

आरवायके ८२ ८२.४ ८५.८ ९२.६

केटीएचएम ७८.२ ८३.८ ८३.६ ९०.६

केएसकेडब्‍ल्‍यू ८०.८ ८०.८ ८२.४ ९०

हिरे महाविद्यालय ७३.२ ८२.६ ७९.४ ८६.४

बिटको, नाशिक रोड ७६.४ ७५.४ ७९.२ ८८.८

भोसला सैनिकी ७७ ८२.६ ८२ ८८.६

नाईक (विनाअनु.) ७१.६ ८१.२ ७७.६ ८५.६

वाणिज्‍य शाखेचा कट-ऑफ नव्वदीत

बीवायके महाविद्यालयात खुल्‍या प्रवर्गाचा ९०.८ टक्‍के कट-ऑफ आहे. ‘केटीएचएम’चा ८६.४ टक्‍के राहिला. हिरे महाविद्यालयाचा ७१ टक्‍के, नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयाचा ८२.८ टक्‍के, नाईक महाविद्यालयाचा ७० टक्‍के, भोसला महाविद्यालयाचा ८६.२ टक्‍के कट-ऑफ राहिला.

- ‘केटीएचएम’च्या कला शाखेचा कट-ऑफ ८१.२ टक्‍के

- ‘एचपीटी’चा कट-ऑफ ८१ टक्‍के

- राज्‍य शिक्षण मंडळाच्या १९,११०; ‘सीबीएसई’च्‍या १,०९३ विद्यार्थ्यांची नोंदणी

- अकरावीच्‍या २३,०८४ जागा प्रवेशफेऱ्यांतून, कोट्याच्‍या ४,६७६ जागा उपलब्‍ध

Collage Admission
Nashik News : काश्‍यपी धरणग्रस्त आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार! धरणातील पाणी आरक्षण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.