Nashik Junior Collage Admission : पात्र अकरा हजारांपैकी चार हजार 895 विद्यार्थ्यांची निवड! विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रम

Nashik News : अकरावीच्‍या केंद्रिभूत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
Collage Admission
Collage Admissionesakal
Updated on

Nashik News : अकरावीच्‍या केंद्रिभूत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. बुधवारी (ता. १०) जाहीर केलेल्‍या दुसऱ्या नियमित फेरीच्या गुणवत्ता यादीसाठी अकरा हजार विद्यार्थी पात्र असताना प्रत्‍यक्षात मात्र चार हजार ८९५ विद्यार्थ्यांची यादीत निवड केली आहे. विद्यार्थ्यांना शनिवार (ता. १२)पर्यंत प्रवेशाची मुदत असेल. (Nashik Junior Collage Admission)

उपलब्‍ध जागांची संख्या, प्रवेश फेरीसाठी पात्र विद्यार्थ्यांचा आकडा मोठा असतानाही प्रत्‍यक्षात गुणवत्ता यादीत निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तोकडी राहत असल्‍याने गोंधळाची स्‍थिती निर्माण झाली आहे. शिक्षण विभागातर्फे नाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रिभूत प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे.

याअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करून वैयक्‍तिक माहितीवर आधारित अर्जाचा भाग एक, तर महाविद्यालय व शाखेच्‍या पसंतीक्रमावर आधारित अर्जाचा भाग दोन भरणे अनिवार्य आहे. पहिल्‍या नियमित फेरीत सहभागासाठी १६ हजार ४१४ विद्यार्थी पात्र असताना गुणवत्ता यादीत दहा हजार ८३१ विद्यार्थ्यांचा समावेश होता.

यामधून जेमतेम सहा हजार ६६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले होते. पहिल्‍या फेरीनंतर १७ हजार ३८९ जागा रिक्‍त राहिल्‍या होत्‍या. इतक्‍या मोठ्या प्रमाणात जागा रिक्‍त असताना दुसऱ्या नियमित फेरीत अवघ्या चार हजार ८९५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आल्याने, याविषयी संभ्रमाची स्‍थिती आहे. (latest marathi news)

Collage Admission
Nashik Dada Bhuse : जिल्हा बॅंक सक्तीच्या वसुलीविरोधात लवकरच बैठक : भुसे

कारणाबाबत अस्‍पष्टता...

प्रवेश फेऱ्यांमध्ये निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडा कमी राहण्याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. विद्यार्थ्यांना एक ते दहा पर्याय नोंदविण्याची मुभा असताना अनेक विद्यार्थी केवळ एकच पर्याय निवडत असून, गुणवत्ता यादीनुसार त्‍यांची निवड होत नसल्‍याने ते प्रवेशापासून वंचित राहत असल्‍याचा एक तर्क लावला जात आहे.

गुणवत्ता यादीत निवडीसाठीच्‍या ठरविलेल्‍या सूत्रामुळे निवड होणाऱ्या विद्यार्थी संख्येत घट झाल्‍याचे काहींकडून बोलले जात आहे. अकरावीकडे विद्यार्थी पाठ फिरवत असल्‍याचा अंदाजदेखील काहींकडून लावला जात आहे.

विज्ञानाचा उंचावला कटऑफ

पहिल्‍या यादीत अनुदानित जागेसाठी विज्ञान शाखेचा कटऑफ ९२.६ टक्‍के राहिला होता. दुसऱ्या यादीतही आरवायके महाविद्यालयाचा कटऑफ ९२.४ टक्‍के राहिला आहे. वाणिज्‍य शाखेत बीवायके महाविद्यालयाचा कटऑफ ८८.४ टक्‍के राहिला आहे.

Collage Admission
Nashik News : केंद्र शासन राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारासाठी जिल्ह्यातील एक हजार 385 ग्रामपंचायतींची नोंदणी

दुसऱ्या फेरीसाठी उपलब्‍ध जागा- १७ हजार ३८९

फेरीत सहभागासाठी पात्र विद्यार्थी- ११ हजार ७

यादीत निवड झालेले विद्यार्थी- चार हजार ८९५

प्रवेश निश्‍चित केलेले विद्यार्थी- ७२९

पसंतीक्रमनिहाय महाविद्यालय मिळालेल्या

विद्यार्थ्यांचा तपशील असा-

प्रथम पसंतीचे------ दोन हजार ४९७

द्वितीय पसंतीचे--- एक हजार ८३

तृतीय पसंतीचे-------५४५

चौथ्या पसंतीचे------३५३

पाचव्‍या पसंतीचे----१९४

Collage Admission
Nashik Tree Plantation : पर्यावरण रक्षणार्थ सरसावले जलसंपदा सेवानिवृत्त अभियंता मित्रमंडळ!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.