Nashik Rice Crop Crisis : इगतपुरीत भातावर ‘कडा करपा’चा प्रादुर्भाव! संततधारेचा परिणाम; उत्पादन घटण्याची बळीराजाला भिती

Latest Agriculture News : गेल्या दहा-बारा दिवसांपासून संततधारेसह मुसळधार पाऊस कोसळत असल्याने भात पिकावर कडा करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटण्याची भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
Due to the continuous rains, the color of the rice crop is changing due to the disease of kada karpa.
Due to the continuous rains, the color of the rice crop is changing due to the disease of kada karpa.esakal
Updated on

इगतपुरी : भाताचे आगर आणि पावसाचे माहेरघर असणााऱ्या इगतपुरी तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असून, भात पिकही दमदार आले आहे. मात्र, गेल्या दहा-बारा दिवसांपासून संततधारेसह मुसळधार पाऊस कोसळत असल्याने भात पिकावर कडा करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटण्याची भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे. (Kada Karpa outbreak on rice in Igatpuri)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.