Nashik News : जिल्ह्यातील जास्तीत जास्त अंगणवाड्या स्मार्ट करण्यात याव्यात, त्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावेत. अंगणवाडीतील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षणाचे योग्य पद्धतीने धडे देण्यात यावेत, अशा सूचना राज्याचे महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त कैलास पगारे यांनी केल्या. (maximum number of Anganwadis should be made smart)
आयुक्त पगारे यांनी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने अंगणवाडी, खंबाळे तसेच त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालयातील बालउपचार केंद्राला भेटी दिल्या. महिला व बालविकास विभागाचे विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे, जिल्हा बालविकास अधिकारी सुनील दुसाने, जिल्हा परिषदेतील महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील.
प्रकल्प अधिकारी भारती गेंदगे, सचिन शिंदे, संजय कोंढार, पंडित वाकडे, श्वेता गडाख आदी उपस्थित होते. पहिने येथील अंगणवाडी केंद्रात बालकांची संख्या चांगली आढळून आली. आयुक्त पगारे यांनी अंगणवाडीतील विविध योजनांचा सविस्तर आढावा घेतला. पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी अंगणवाडी केंद्र महत्त्वाचे आहे.
त्यामुळे येथे बालकांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. पोषण ट्रॅकरबाबत श्री. पगारे यांनी अंगणवाडी सेविकांना विचारणा करीत त्यांचा आढावा घेतला. ऑनलाइन पद्धतीने सर्व माहिती अपडेट केली जात आहे की नाही, याची शहानिशाही केली. नियमित आहारातील पाककलेबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. (latest marathi news)
खंबाळे येथील अंगणवाडी परिसरातील परसबागेचे कौतुक करीत श्री. पगारे यांनी येथे वृक्षारोपण केले. जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्या स्मार्ट केल्या जात असल्याची माहिती प्रताप पाटील यांनी दिली. उपस्थित गर्भवती महिलांशी त्यांनी संवाद साधला.
कुपोषित बालकांना केंद्रात आणा
त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालयातील बालउपचार केंद्राला आयुक्त पगारे यांनी भेट दिली. त्या वेळी केंद्रात सात कुपोषित बालकांवर उपचार सुरू होते. त्यांनी जिल्ह्यातील कुपोषित बालकांचा आढावा घेतला.
दोन महिन्यांत कुपोषित बालकांची संख्या कमी झाली असल्याचे श्री. पाटील यांनी सांगत, कुपोषणमुक्तीसाठी करीत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. बालउपचार केंद्रात जास्तीत जास्त कुपोषित बालके दाखल करून त्यांच्यावर योग्य ते उपचार करावेत अन कुपोषण कमी करावे, अशा सूचना श्री. पगारे यांनी केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.