Nashik News : ‘जय जवान- जय किसान’ नावालाच : कैलास भोसले

Nashik : शेतकऱ्यांसाठी विविध घोषणा करायच्या, प्रत्यक्षात मात्र राज्यकर्त्यांचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही.
Girish Jakhotia, Sanjay Yadavrao, Vilas Shinde, Shashikant Jadhav, Kailas Bhosale etc. participated in the seminar of All India Maratha Federation.
Girish Jakhotia, Sanjay Yadavrao, Vilas Shinde, Shashikant Jadhav, Kailas Bhosale etc. participated in the seminar of All India Maratha Federation.esakal
Updated on

Nashik News : शेतकऱ्यांसाठी विविध घोषणा करायच्या, प्रत्यक्षात मात्र राज्यकर्त्यांचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. फक्त ‘जय जवान- जय किसान’ म्हणायचे आणि शेतीची दुरवस्था असताना थट्टा करायची, असाच प्रकार सुरू असल्याचा आरोप राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी केला. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशनात रविवारी (ता. ११) पहिल्या सत्रात ‘कृषी, उद्योग, पर्यटन, रोजगार क्षेत्रातील संधी आणि मराठा समाज’ या विषयावर प्रकट मुलाखत झाली. (Kailash Bhosale statement of Jai Jawan Jai Kisan in name itself )

यात सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे, आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वित्तीय सल्लागार व लेखक डॉ. गिरीश जाखोटिया, ग्लोबल कोकणचे अध्यक्ष संजय यादवराव, ‘निमा’चे माजी अध्यक्ष शशिकांत जाधव यांनी सहभाग नोंदविला. भाषण कला संवाद प्रशिक्षक शशांक मोहिते यांनी मुलाखत घेतली. श्री. भोसले म्हणाले, की द्राक्ष उत्पादक शेतकरी १८ ते २० टक्के विविध मार्गांनी ‘जीएसटी’ भरतो. मात्र, जसा कंपन्यांना त्याचा परतावा दिला जातो, तसा शेतकऱ्यांनी तो कोणाकडे मागायचा? राज्यात ४.५ लाख एकर द्राक्ष शेती आहे.

प्रतिएकर तीन मजूर धरल्यास किमान १५ लाख रोजगारनिर्मिती होते. मात्र, तरीही सरकार शेतीकडे उद्योग म्हणून पाहत नाही. शेतीला पाठबळ देत नसल्याची खंत मांडली. सरकारी हस्तक्षेपामुळे शेतकरी अडचणीत आहे. शेतमाल निर्यातीत केंद्र सरकारने हस्तक्षेप थांबवावा व स्थिर धोरण ठेवावे, अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली. (latest marathi news)

Girish Jakhotia, Sanjay Yadavrao, Vilas Shinde, Shashikant Jadhav, Kailas Bhosale etc. participated in the seminar of All India Maratha Federation.
Nashik News : संपामुळे सातशे टन कचरा पडून! खत प्रकल्प कर्मचारी संपावर तोडगा नाहीच

श्री. जाखोटिया म्हणाले, की शेती व्यवसायात नियोजनपूर्वक काम केल्यास आर्थिक समस्या सुटण्यास मदत होईल. घरातील महिला ते चोखपणे करू शकतात. श्री. यादवराव म्हणाले, की कृषी क्षेत्रात संधी ओळखून कामकाज करताना मार्केटिंग व ब्रँडिंगची गरज आहे. कोकणात काजू, आंबा यांसारख्या पिकात रोजगार निर्मितीची क्षमता आहे. मात्र, विकासाच्या मूळ मुद्द्यावर अर्थसंकल्पात तरतूद होत नाही, अशी खंत त्यांनी मांडली.

‘शेतीतले ब्रँड व्हावेत’

जागतिकीकरणात जग हीच मोठी बाजारपेठ आहे. आता उपलब्ध जमीन, भांडवल व पाणी हे मुख्य स्रोत अभ्यासून पीक रचना ठरविण्याची वेळ आहे. शेतीत प्रगतीसाठी विकले जाणारेच पिकविता आले पाहिजे. कमी जागेत अधिक उत्पादन घेण्याची गरज आहे. ‘अमुल’च्या धर्तीवर शेतीतून ब्रँड पुढे आले पाहिजेत. आता संघटितपणे व्यावसायिक काम करावे लागेल, असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले.

Girish Jakhotia, Sanjay Yadavrao, Vilas Shinde, Shashikant Jadhav, Kailas Bhosale etc. participated in the seminar of All India Maratha Federation.
Nashik News : वसतिगृहातील आरक्षित कोटा न्यायालयाकडून रद्द; उच्च न्यायालयाचा निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.