Kajwa Festival 2024 : भंडारदऱ्याला लागले काजव्यांचे वेध! हरिश्चंद्रगड-घाटगर अभयारण्यात पर्यटकांची गर्दी

Kajwa Festival : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काजव्यांचा करिश्मा सुरू झाला असून, भंडारदऱ्याला काजव्यांचे वेध लागल्याची जाणीव होऊ लागली आहे.
Crowd of tourists in Rishchandragad-Ghatgar Sanctuary
Crowd of tourists in Rishchandragad-Ghatgar Sanctuaryesakal
Updated on

Kajwa Festival 2024 : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काजव्यांचा करिश्मा सुरू झाला असून, भंडारदऱ्याला काजव्यांचे वेध लागल्याची जाणीव होऊ लागली आहे. त्यामुळे पर्यटकांची पावले आपोआपच भंडारदऱ्याच्या दिशेने सरकू लागली आहेत. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात असणाऱ्या कळसूबाई हरिश्चंद्रगड अभायारण्यात काजव्यांची चमचम सुरू झाली आहे. ही तारकारूपी काजव्यांची चमचम बघण्यासाठी पर्यटकांचे थवेच्या थवे भंडारदऱ्याच्या दिशेने आगेकूच करताना दिसून येत असून, भंडारदऱ्याच्या टोलनाक्यावर पर्यटकांची रीघ दिसून येत आहे.

काय आहे काजवा महोत्सव?

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये असणाऱ्या कळसूबाई हरिश्चंद्रगड अभायारण्यात हिरडा, सादडा, बेहडा, जांभूळ यासारख्या झाडांवर काजवा नावाचा किटक पावसाच्या अगोदर एकाच वेळेस कोट्यवधींच्या संख्येने लयबद्ध चमकताना दिसून येतात. ही काजव्यांची लयबद्ध चमचम क्षणात वर जाते व दिसेनासी होते. हा अविस्मरणीय क्षण डोळ्यांत साठविण्यासाठी पर्यटक भंडारदऱ्याच्या अभयारण्यात गर्दी करतात.

काजव्यांचा या चमचमण्याला पर्यटकांनी ‘काजवा महोत्सव’ हे गोंडस नाव दिले आहे. भंडारदऱ्याच्या अभयारण्यात पांजरे, उडदावणे, मुरशेत, रतनवाडी, मुतखेल, कोलटेंभे तसेच राजूर परिसरातील फोफसंडी, पुरुषवाडी, हरिश्चंद्रगडच्या परिसरात काजव्यांचा हा करिश्मा बघायला मिळतो. पाऊस सुरू होण्याच्या अगोदर काही दिवस काजवे झाडांवर चमकताना दिसतात. हा काजव्यांचा मिलनाचा कालावधी असून, काजव्यांचे जीवनमान जास्तीत जास्त तीन आठवडे असते. (latest marathi news)

Crowd of tourists in Rishchandragad-Ghatgar Sanctuary
Kajwa Mohotsav : काजवा महोत्सवासाठी पर्यटकांचे बुकिंग सुरू; या तारखेपासुन निरीक्षणाची संधी

काजवा त्याच्या शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रियेची सुरवात व शेवट निश्चित करू शकतो, ही सर्व क्रिया त्याच्या प्रकाश अवयवात होते. काजव्याच्या शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रियेत जेव्हा ऑक्सिजन मिसळतो तेव्हा प्रकाश तयार होतो व जेव्हा ऑक्सिजन उपलब्ध नसतो तेव्हा प्रकाश बंद असतो म्हणून आपल्याला काजवा लुकलुकताना दिसतो. कीटकांच्या शरीरात फुफ्फुस नसते. त्यांच्या शरीरावरच्या त्वचेच्या पातळ थरांमधून ऑक्सिजन आत-बाहेर करतो.

एका पावसाची अत्यंत गरज

ग्रीष्म ऋतूला निरोप देताना वर्षाराणीच्या स्वागतासाठी निसर्गदेवताच जणू काजव्यांची ही लक्ष लक्ष प्रकाशफुले मुक्तहस्ते उधळत नभांगणातील तारांगण जणू भुईवर उतरल्याचा भास होतो. तासन् तास पाहत बसले तरी मन तृप्त होत नाही. भंडारदरा धरणाच्या अभयारण्यात यंदा प्रचंड उष्णता असल्याने काजव्यांचे म्हणावे असे आगमन झालेले नसले.

तरी बुद्ध पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात काजव्यांची सुरू असलेली चमचम काहीशी कमी वाटते. जसजशी अंधारी रात्र वाढत जाईल, तसतशी काजव्यांची चमचम संपूर्ण अभयारण्याला आपल्या प्रकाशाने भुरळ घालेल. तरीही एका पावसाची भंडारदऱ्याला काजव्यांना बहरण्यासाठी अत्यंत गरज आहे.

Crowd of tourists in Rishchandragad-Ghatgar Sanctuary
Kajwa Festival 2023 : लक्ष लक्ष दिव्यांनी तारांगण अवतरले भूतलावरी! काजवा महोत्सवाची धूम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.