Nashik Kala katta : अष्टपैलू तबलावादक नितीन पवार

nitin pawar
nitin pawaresakal
Updated on

भारतीय संगीतातील, गायन, वादन आणि नृत्य या तिन्ही प्रकारांमध्ये साथसंगतीचे प्रमुख वाद्य म्हणजे तबला. स्वतंत्र तबला वादनाच्या बरोबरीने, संगीतातील वरील तिन्ही प्रकारांना सारख्याच तयारीने साथसंगत करणारे आणि त्याबरोबरच एकीकडे विद्यार्थ्यांनाही घडविणारे तबलावादक फार कमी असतात.

नाशिकचे तबला गुरू व ज्येष्ठ तबलावादक नितीन पवार हे अशा अष्टपैलू कलाकारांपैकी एक. पवार तबला ॲकॅडमी या आपल्या संस्थेतून अनेक विद्यार्थ्यांना तबला मार्गदर्शन करणारे पवार ‘सकाळ’च्या वाचकांशी संवाद साधताना म्हणतात, तबला साधनेमध्ये सातत्य आणि चिकाटीला फार महत्त्व आहे.

दरवर्षी माझ्याकडे शेकडो विद्यार्थी तबला शिकण्यासाठी प्रवेश घेतात, त्यातले जेमतेम निम्मे टिकतात. तीन- चार वर्षानंतर, खरा तबला शिकण्यासाठी एक दोन विद्यार्थी पुढे शिकविण्यासाठी हाताशी लागतात. चिकाटी दाखवणाऱ्या अशा विद्यार्थ्यांना मग मी माझ्या क्लासपुरते अडकवून न ठेवता पुढे शिकायला, पैलू पाडायला, मोठ्या गुरूंकडे पाठवतो. - तृप्ती चावरे-तिजारे

(nashik kala katta interview of tabla player Nitin Pawar by trupti chaware tijare news)

बालपणापासूनच नितीनजींच्या घरात तबल्याचे वातावरण होते. तबला वादनातील तंत्र आणि मंत्र त्यांनी, त्यांचे वडील व नाशिकचे ज्येष्ठ तबला गुरू पं. भानुदास पवार यांच्याकडून आत्मसात केले. एक जाणकार आणि नजर देणारे तबला वादक गुरू म्हणून भानुदासबुवांना संगीत क्षेत्रात फार मोठा मान होता.

पं. सुरेश तळवलकर, पं. नाना मुळे, पं. ओंकार गुलवडी अशी दिग्गज मंडळी त्यांचे घरी मुक्कामी असे. घरात त्यांच्या गप्पा जमत. कला विचारांच्या त्या पर्वणीतूनच नितीनजींवर तबल्याच्या आणि मेहनतीच्या कायद्याचे संस्कार झाले. तबल्याचे हे कायदे गिरविता, गिरविता तबला हेच जीवनाचे साध्य ठरले. शिक्षणाची आदानप्रदान सुरू असतानाच भारताबरोबरच त्यांना मलेशिया व सिंगापूर येथील प्रतिष्ठित संगीत संमेलनातून तबला सादरीकरणाची संधी मिळाली.

१९९७ साली भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाची तबला वादनाची शिष्यवृत्तीही त्यांना मिळाली. तबला विशारद आणि एम. ए. संगीत असलेले नितीनजी आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार आहेत. अध्यापक महामंडळ परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार, रोटरी क्लब नाशिक आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाला. पं. नारायण जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा मानाचा ‘अभिमान पुरस्कार’ त्यांना ख्यातनाम तबलावादक पं योगेश समसी यांचे हस्ते मिळाला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

nitin pawar
Nashik Kala Katta : सुंदर अक्षर घडविणारे सुलेखनकार नीलेश, पूजा गायधनी

त्यांच्या हातून होणाऱ्या तबला प्रसाराची दखल घेत, नाशिक शहराचा महापौर गौरव पुरस्कार व यासारखे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. इतके यश मिळवूनही त्यांचे शिक्षण आजही तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्याकडे सुरू आहे. नाशिक येथे वरचेवर होणाऱ्या पं. तळवलकर सरांच्या शिबीरात ते आपल्या विद्यार्थ्यांना आवर्जून सहभागी व्हायला सांगतात.

नाशिकमध्ये तबला या वाद्याला जो सांस्कृतिक वारसा लाभला आहे, त्याचे संगोपन करण्यात नितीनजींचा फार मोठा वाटा आहे. तबलावादनात त्यांनी स्वतः जी अष्टपैलू नजर कमावली ती विद्यार्थ्यांमध्येही रुजावी, हात तयार होण्याबरोबरच त्यांचा कान आणि नजरही तयार व्हावी यासाठी पवार सर डोळसपणे तबला वादनाचे मार्गदर्शन करीत असतात.

विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की तबला ही, इतर ॲक्टिव्हिटी करता करता शिकण्याची कला नाही. त्यासाठी पुरेसा आणि स्वतंत्र वेळ दिला पाहिजे. गेल्या वर्षी पवार तबला ॲकॅडमीने ‘तालाभिषेक’ हा सुवर्णमहोत्सव साजरा केला. वर्षभर चाललेल्या या महोत्सवात नाशिक तसेच नाशिक बाहेरील अनेक नामवंत कलाकारांनी आपली कला प्रस्तुत केली.

नाशिकचे कला भवितव्य उज्ज्वल

कला संस्कृतीच्या प्रवाहात वाढणार्या विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि भावविश्व फार संयमाने हाताळावे लागते. त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात कलेचा वाटा फार मोठा असतो. त्याकडे संस्कार म्हणून बघण्याची जबाबदारी ओळखून पवार सर ज्या निष्ठेने विद्यार्थी घडविण्याचे काम करीत आहेत, त्याकडे पाहता नाशिकचे कला भवितव्य उज्ज्वल आहे असे म्हणावे लागेल.

nitin pawar
Nashik Kala Katta : नाशिकचे सौंदर्यवादी, कल्पक छायाचित्रकार समृद्ध मोगल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()