Shubham Joshi
Shubham Joshiesakal

Nashik Kala Katta: ध्वनि तंत्रज्ञानाचा कानमंत्र गवसलेले तरल तंत्रज्ञ : शुभम जोशी

Published on

"आजच्या विज्ञानयुगात कोणत्याही कलेच्या वाटेवरून मार्गक्रमण करीत असताना प्रत्येक कलाकाराला केव्हा ना केव्हा तंत्रज्ञानाचे बोट धरावेच लागते. मात्र हे तंत्रज्ञान कलात्मक पद्धतीने हाताळणारे तंत्रज्ञ फार कमी असतात. नाशिकचे तरुण ध्वनीतंत्रज्ञ शुभम जोशी हे अशाच मोजक्या तंत्रज्ञांपैकी एक. कारण मुळात ते स्वतः एक चांगले तबला वादकही आहेत. संगीत, नाट्य अभिवाचन, व्हॉइस ओव्हर, लघुपट आणि साउंड इंजिनिअरिंग या क्षेत्रातील तज्ञांचे लक्ष वेधून घेणारे शुभमजी ‘सकाळ’च्या वाचकांशी संवाद साधताना म्हणतात, कलेतून व्यक्त होणारी भावना स्पष्ट, सुंदर आणि प्रवाही करणे हे ध्वनी संयोजकांचे काम आहे. ते ऐकण्याच्या कौशल्यावर अवलंबून असते. आत्ताच्या डिजिटल युगात या सूक्ष्म कौशल्याचा अभ्यास प्रत्येक कलाकाराने केला पाहिजे कारण त्यातून कान तयार होतो. परफॉर्मन्स आणि साउंड या दोन्हीही गोष्टी वेगवेगळ्या नसून परस्पर पूरक आणि सादरीकरणाचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक आहेत."- तृप्ती चावरे-तिजारे

(Nashik Kala Katta Sound Technologys Ear Mantra Liquid Technologist Shubham Joshi)

फिल्मफेअरच्या नॉन फिक्शन शॉर्ट फिल्ममध्ये विजेते ठरलेल्या वारसा, द बॅकयार्ड आणि द सॉकर सिटी या लघुपटासाठी, तसेच नेटफ्लिक्स या लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मवरील शॉर्ट फिल्म ‘सोलकढी’, प्लॅनेट मराठीवरील ‘शून्यता’, अजमेर येथील थीम पार्कसाठी आगामी वेब सिरीज ‘मांत्रिक’ यासाठी संगीत दिग्दर्शक आणि साउंड डिझायनर म्हणून शुभमजींनी ध्वनीतंत्रज्ञान या क्षेत्रात नाशिकची एक नवी ओळख निर्माण केली आहे.

ॲमेझॉन प्राइमसाठी ‘बंदिश बँडिट या गाजलेल्या वेब सिरीजसाठी त्यांनी सहाय्यक ध्वनीतंत्रज्ञ म्हणून सहभाग नोंदविला, तर सध्या चर्चेत असलेल्या मेलबर्न, कान्स आणि शिकागो फिल्म फेस्टिव्हलमध्ये अधिकृतपणे नामांकन झालेल्या शूर्पणखा लघुपटासाठी साउंड आणि मिक्सिंग डिझायनर म्हणून शुभमजींची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंदविली गेली आहे.

याआधी २०१९ साली फिल्मफेअर पुरस्काराचे नामांकन मिळालेल्या, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झालेल्या, नाशिकचे जयेश आपटे यांनी दिग्दर्शित केलेल्या धगड या लघुपटासाठी तसेच त्यांच्या या ‘देवमाणूस' मराठी व्यावसायिक नाटकासाठी त्यांनी केलेले संगीत संयोजन विशेष लक्षवेधी ठरले.

शंभरहून अधिक गाण्यांसाठी मिक्सिंग इंजिनिअर म्हणून कारकीर्द गाजवणाऱ्या शुभमजींनी अनेक ऑडिओ स्टोरीज डिझाइन केल्या आहेत. रिमा सदाशिव अमरापूरकर यांचे ऑडिओ बुक्स, तसेच ‘स्टोरी टेल’ साठी आयएएस अधिकारी विश्वास नांगरे, आयपीएस अधिकारी भरत आंधळे यांचेही ऑडिओ त्यांनी डिझाईन केले आहेत.

५.१ सिंक साउंड व फोली हे आधुनिक तंत्रज्ञान पुरविणारा ‘फेदर टच’ हा त्यांचा स्वतःचा स्टुडिओ आज नाशिकमधील एक नावाजलेला स्टुडिओ आहे, ज्यात मुंबई इंडस्ट्रीतील मोठी कामेही केली जातात.

Shubham Joshi
Nashik Kala Katta: कलावारसा समृद्ध करणारे समन्वयवादी बासरीवादक : समृद्ध कुटे

प्रसिद्ध शास्त्रीय गायक डॉ. भरत बलवल्ली यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रागौपनिषद’ या भारतातील भव्य शास्त्रीय संगीत प्रकल्पासाठी नुकतेच त्यांनी रेकॉर्डिंगचे काम पूर्ण केले आहे.

या सगळ्या व्यावसायिक यशाच्या पलीकडे जाऊन, कल्पक प्रतिभेचे जाणकार अशी ओळख शुभमजींनी संगीत क्षेत्रात निर्माण केली आहे. याचे कारण, मानवी आवाजातला जिवंतपणा आणि सौंदर्य ओळखणारा आणि सांभाळणारा त्यांचा कान व त्यांना त्याचा गवसलेला मंत्र.

हाच कानमंत्र वापरून ते ध्वनीतंत्रज्ञान हा विषय कितीही रूक्ष असला तरी कला म्हणून हाताळू शकतात. संगीतातील ध्वनींवर तंत्रज्ञानाच्या मदतीने केलेले संस्कार, प्रक्रिया आणि नवनिर्मिती याबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन यांत्रिक किंवा तांत्रिक नसून कलापूर्ण आहे.

याबाबत ते म्हणतात, संगीतकाराला शब्द वाचताच चाल सुचते, पण मला त्या चालीमागचा, श्रोत्यांचा कान ऐकू येतो. मूळ ध्वनीवर कर्णसुलभ संस्कार करून, प्रत्येक गरजेनुसार वेगवेगळा अनुभव देण्याचा माझा प्रयत्न असतो.

यंत्र हे फक्त एक माध्यम आहे पण त्यातून समाधान मिळणं हे माझ्यासाठी पहिलं प्राधान्य आहे. ऐकू येणाऱ्या प्रत्येक ध्वनीवर प्रक्रिया करताना त्या निर्मितीमागचा विचार, हेतू, सौंदर्य आणि भावना प्रवाही करण्याचा मी प्रयत्न करतो. शास्त्रपक्ष, कलापक्ष आणि तंत्रपक्ष यां तिन्ही घटकांच्या समन्वयानेच

कलावंतांची कला बहरू आणि फुलू शकते यावर विश्वास असणारे शुभम जोशी यांनी एक कुशल ध्वनीतंत्रज्ञ म्हणून नाशिकच्या कलाभूमीत कलाकार आणि रसिक यांना जोडणारा ध्वनीसंयोजनाचा एक सेतू उभारला आहे ही अभिमानास्पद गोष्ट आहे

Shubham Joshi
Nashik Kala Katta: शिल्पसंवादाचे नायक : शिल्पकार वरुण भोईर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()