Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’साठी कळवणला मोफत अर्ज!

Nashik News : महिलांना ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुक्याला जाऊन दाखले काढण्याची गरज नाही, तर प्रत्येकाला आपापल्या गावातच या योजनेच्या लाभासाठी सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanaesakal
Updated on

Nashik News : राज्य सरकारकडून राज्यातील महिलांना ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुक्याला जाऊन दाखले काढण्याची किंवा तालुक्यातील कोणत्याही कार्यालयात वा सेतू केंद्रावर रांगा लावण्याची गरज नाही, तर प्रत्येकाला आपापल्या गावातच ग्रामसेवक, अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे. (Ladki Bahin Yojana)

अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन लाडक्या बहिणींना सोप्या पद्धतीने सुविधा कशी उपलब्ध होईल, त्यानुसार अनेक अटी-शर्ती वगळून या योजनेचा कालावधीही वाढविला असून, ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची मुदत दिली आहे.

त्यामुळे स्थानिक पातळीवर महिलांनी योग्य मार्गदर्शनाने या योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी सिंग यांनी केले आहे. (latest marathi news)

Ladki Bahin Yojana
Nashik Water Shortage : 935 गावे-वाड्यांना 228 टॅंकरद्वारे पाणी; पावसाअभावी टॅंकरला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

शासन निर्णयानुसार ‘नारीशक्ती दूत’ या नावाचे अॅप अंगणवाडीसेविका, ग्रामसेवक तसेच सेतू केंद्रांकडे दिले असून, त्यांनी त्यावर स्वतःची नोंदणीही करून घेतली आहे. प्रत्येक अर्जाच्या मागे ५० रुपये मानधन हे शासनाकडून संबंधिताला मिळणार आहे.

त्यामुळे या योजनेसाठी लाभार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, अशी माहिती देत लाभार्थ्यांकडून कुठेही पैशांची मागणी केल्यावर कारवाई केली जाईल. त्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंह यांनी केले.

Ladki Bahin Yojana
Nashik Dengue Update : जिल्ह्यात आतापर्यंत 79 रुग्णांना डेंगीची लागण! जूनमध्ये 28 डेंगींचे रुग्ण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.