नाशिक : कश्यपी धरणग्रस्तांच्या मागण्या मान्य न झाल्यास थेट धरणापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. धरणग्रस्तांनी बुधवारी (ता. १८) महापालिका आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत हा इशारा दिला. आता टोकाचे पाऊल उचलण्याची आमची मनःस्थिती तयार झाल्याचे या आंदोलकांनी सांगितले. धरणापासून प्रथम महापालिका कार्यालयात येत आंदोलकांनी आयुक्त करंजकर यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला. ( Kashyapi Dam Victims Warn of Foot March Statement to Municipal Corporation District Collectors )
त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देत त्यावर गुरुवार (ता. १९)पासून उपोषणाला बसण्याचा इशारा दिला. भूसंपादन करताना प्रत्यक्ष जागेवर ३७२ शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून आम्हाला देशोधडीला लावण्याचे काम पाटबंधारे विभागाने केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. (latest marathi news)
या संदर्भात स्थानिक आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्हाला न्यायाची अपेक्षा होती. मात्र त्यावर अद्यापही काहीच निर्णय न झाल्याने आम्ही उपोषणाचा निर्णय घेतल्याचे त्यात म्हटले आहे. आंदोलनात संजय गायकवाड, सागर पिंपळके, सागर तुपलोंढे, दिलीप गायकवाड, तुळशीदास बेंडकोळी सहभागी झाले.
प्रमुख मुख्य मागण्या
-३० टक्के पाणी जुलैअखेरपर्यंत ठेवण्यात यावे.
-प्रत्येक प्रकल्पग्रस्ताच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी द्यावी.
-बाधित प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व्हावे.
-जमिनीचा मोबदला आताच्या किमतीत मिळावा.
-प्रकल्पग्रस्त दाखला काढण्यासाठी कोणत्या अटी, शर्ती नको.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.