Kashyapi Dam
Kashyapi Damesakal

Nashik News : काश्‍यपी धरणग्रस्त आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार! धरणातील पाणी आरक्षण

Nashik News : स्थानिकांसाठी काश्यपी धरणात ऑगस्टपर्यंत पाणीसाठा राखीव ठेवावा, पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावावा, यासह विविध मागण्यांसाठी काश्यपी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेणार आहेत.
Published on

Nashik News : स्थानिकांसाठी काश्यपी धरणात ऑगस्टपर्यंत पाणीसाठा राखीव ठेवावा, पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावावा, प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला मिळावा यासह विविध मागण्यांसाठी काश्यपी प्रकल्पग्रस्त तसेच ग्रामस्थ शुक्रवारी (ता. २८) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेणार आहेत. (Kashyapi dam victims will meet district collector today)

तत्पूर्वी, या ग्रामस्थांनी गुरुवारी (ता.२७) पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांसोबत चर्चा करत आपल्या व्यथा मांडल्या आहेत. गंगापूर धरणातील पाणी कमी झाल्याने काश्यपीतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. मात्र, या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या ग्रामस्थांनी धरणाच्या गेटवर ठिय्या आंदोलन करत विसर्ग थांबविण्याची मागणी केली.

या वेळी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत त्यांचे प्रश्न समजावून घेतले. त्यानुसार गुरुवारी (ता. २७) शहाणे यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. त्यावर अंतिम तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांसमोर बैठक होणार आहे. (latest marathi news)

Kashyapi Dam
Nashik News : अतिक्रमणामुळे डावा कालवा बंदीस्त होणार! जलसंपदा विभागाकडून 8 किलोमीटर बंदीचा प्रस्ताव

"पुनर्वसन, जमिनीचा मोबदला असे अनेक प्रश्न आहेत. त्यावर शुक्रवारी आयोजित बैठक जर समाधानकारक तोडगा निघाला नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल." - कैलास बेंडकोळी, ग्रामस्थ

"ग्रामस्थांसोबत आज चर्चा करण्यात आली. त्यांच्या अनेक मागण्या या विविध विभागांशी संबंधित आहेत. प्रारूप बैठक घेत त्यांच्या मागण्या समजावून घेण्यात आल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागांसोबत बैठक घेऊन याबाबत चर्चा करण्याचे ठरले." - सोनल शहाणे, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

Kashyapi Dam
Nashik News : ‘काश्‍यपी’च्या पाण्याला ‘जलसंपदा’चा पुन्हा ब्रेक! रिसॉर्ट मालकांच्या दबावाची चर्चा; 2 दिवसात अवघे 58 दलघफु पाणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.