Nashik News: नाशिकमध्ये कैद्याच्या पोटात निघाली ‘किल्ली’! किल्ली नेमकी कुणाची, याचा तपास सुरू

Nashik Road Central jail
Nashik Road Central jailesakal
Updated on

Nashik News : एरवी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात कोणकोणत्या मार्गांनी काय-काय कैद्यांपर्यंत पोहोच होते, याची नेहमीच चर्चा असते. मात्र, कारागृहातील कैद्यानेच किल्ली गिळंकृत केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पोटात दुखत असल्याने त्याला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्या वेळी शस्त्रक्रियेदरम्यान ही बाब उघड झाली.

दरम्यान, बंदीवानाच्या पोटात असलेली किल्ली कसली आणि त्याने ती का गिळंकृत केली, या प्रश्नांमुळे मध्यवर्ती कारागृहाच्या अधिकाऱ्यांचे धाबे मात्र दणाणले असून, पोलिस ही किल्ली कुणाची याचा तपास करीत आहेत. (Nashik key found in stomach of prisoner investigation whose key belongs to)

Nashik Road Central jail
Nashik Crime: पैसे मागितल्याने गावगुंडांची चहाविक्रेत्याला मारहाण; चहाच्या टपरीचेही केले नुकसान

विजय रामचंद्र सोनवणे (वय ४४, रा. नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह) असे या कैद्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून त्याच्या पोटात दुखत होते. त्यामुळे त्यास उपचारांसाठी कारागृहातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

विजयवर करण्यात आलेल्या वैद्यकीय उपचारांमध्ये त्याच्या पोटात किल्ली असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यास अधिक उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. विजयने दोन महिन्यांपूर्वी किल्ली गिळंकृत केल्याचे समोर येत आहे.

किल्ली गिळंकृत केल्यापासून बंदीवान विजय यास इतक्या दिवसात त्रास झाला नाही का, ती किल्ली त्याच्यापर्यंत पोहोचली कशी, ती किल्ली कसली आहे, त्याने ती गिळंकृत का केली हे आणि असे अनेक प्रश्न यानिमित्त उभे राहिले आहेत. या प्रकारामुळे कारागृह प्रशासनाचे धाबे मात्र दणाणले आहे.

Nashik Road Central jail
Crime: चॉकलेट, मॅगी घेण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्यास सक्तमजुरीची शिक्षा; अनेक मुलींशी गैरवर्तन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.