SAKAL Exclusive : इगतपुरीत 33 हजार 600 हेक्टरवर खरिपाचे उद्दिष्ट; 31 हजार हेक्टरवर होणार भात लागवड

SAKAL Exclusive : इगतपुरी तालुक्यात हंगामातील पावसाचे योग्य वेळेवर आगमन होणार असल्याने तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामातील पेरणीसाठी मशागती करण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे.
Farmer plowing using oxen for sowing.
Farmer plowing using oxen for sowing.esakal
Updated on

SAKAL Exclusive : इगतपुरी तालुक्यात हंगामातील पावसाचे योग्य वेळेवर आगमन होणार असल्याने तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामातील पेरणीसाठी मशागती करण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे. भात लागवडची विविध कामे सध्या सुरू आहेत. यामुळे खरिपाच्या तयारीला वेग आला आहे. शेतकऱ्यांसह कृषी विभागही सज्ज झाला आहे. भात लागवडीत अग्रेसर असणाऱ्या इगतपुरीत यंदा खरिपाचे ३३ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट आहे. (Kharif aims at 33 thousand 600 hectares in Igatpuri for rice farming )

३१ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात येणार आहे. १२६ महसुली गावे व वाड्यांमधील शेतकरी भात, वरई, नागली, सोयाबीन, खुरासणी, मका आदी पिके घेतात. यासोबतच अनेक शेतकरी टोमॅटो, भाजीपालासारखे बागायती पिकेही घेतात. शेतकरी इंद्रायणी, फुले समृद्धी, एक हजार आठ, सोनम, गरी, हाळी, कोळपी या जातीचे भात पीक घेण्यास प्राधान्य देतात.

तालुक्याचे खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र ३१ हजार २२६ हेक्टर असून, यंदाच्या खरिपाचे उद्दिष्ट्य ३३ हजार ६०० हेक्टर असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी दिली. मागील वर्षी ३३ हजार ३०० हेक्टर होते. तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. यामध्ये प्रामुख्याने इंद्रायणी, गरी, कोळपी, १००८, वाय.एस.आर, हळे, पूनम, डी-१००, ओम ३, सेंच्युरी, ओम श्रीराम १२५, रूपाली, रूपम, विजय, आवाणी, लक्ष्मी, खुशबू, सोनम, दप्तरी १००८, वर्षा, राजेंद्र, बासमती आदी प्रमुख जाती घेतल्या जातात. (latest marathi news)

Farmer plowing using oxen for sowing.
SAKAL Exclusive : 10 टक्के लोकांमध्ये किडनीच्या समस्या; वर्षातून 2 वेळा तपासणी आवश्यक

बळीराजा मशागतीत व्यस्त

तालुक्याचे सरासरी क्षेत्र ३१ हजार २२६ हेक्टरवर असून, यात वाढ होत ३३ हजार ६०० हेक्टरवर खरीप पेरणीचे उद्दिष्ट्ये आहे. सध्या तालुक्यात शेतकरी फनणी, नांगरणी, शेणखत पसरविणे, तण गोळा करणे, पालापाचोळा गोळा करणे अशा शेतीच्या मशागतीत व्यस्त असून, बी -बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.

अशी होईल खरिपाची पेरणी (हेक्टरमध्ये)

पिकाचे नाव सरासरी क्षेत्र गेल्या. प्रस्तावित क्षेत्र

वर्षी लागवड

भात २६६०३ ३०८६८ ३१०००

नाचणी १९७८ ९७८ १०५०

वरई १३२७ ९६४ १०५०

भुईमूग ३८० १०० १००

सोयाबीन ९३८ ३९१ ४००

एकूण ३१२२६ ३३३०३ ३३६००

''शेतकरी बांधवांनी भात पिकाचे चांगले उत्पादन होण्यासाठी संकरित वाणाची बियाणे निवडावे. भात खाचरात चिखलणी करताना गिरीश पुष्पचा वापर करावा. नियंत्रित पद्धतीने लागवड १५ बाय २५ सेंटीमीटर वर करावी व यूरिया ब्रिकेट्सचा वापर करावा.''- रामदास मडके, तालुका कृषी अधिकारी, इगतपुरी

Farmer plowing using oxen for sowing.
SAKAL Exclusive : आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत पालक संभ्रमात; मे महिन्यातही एकही प्रवेश नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.