Nashik Agriculture News : खरिपात कांद्यासह मका, सोयाबीनचा बोलबाला; येवल्यात पांढरे सोनं, बाजरी घटणार

Nashik Agriculture : मागील वर्षी दुष्काळात होरपळून निघालेल्या बळीराजाला नव्या खरीप हंगामाची आस लागली असून खरीपाच्या नियोजनात शेतकरी व्यस्त असून यावर्षी मकासह सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होण्याची चिन्हे आहेत.
Here the speed of pre-sowing tillage is applied.
Here the speed of pre-sowing tillage is applied.esakal
Updated on

Nashik Agriculture News : मागील वर्षी दुष्काळात होरपळून निघालेल्या बळीराजाला नव्या खरीप हंगामाची आस लागली असून खरीपाच्या नियोजनात शेतकरी व्यस्त असून यावर्षी मकासह सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होण्याची चिन्हे आहेत. सद्या भाव अस्थिर असले तरी लाल कांदा आमच्या हक्काचा म्हणत दरवर्षीप्रमाणे कांद्याचे क्षेत्रही वाढतेच राहणार आहे. त्या बदल्यात पांढरं-सोनं, बाजरी कडधान्यांच्या क्षेत्रात मोठी घट होईल असे दिसते. ( Kharif season is dominated by maize soya beans with onions )

ब्रिटिशकालीन, दुष्काळी अवर्षणप्रवण आणि राज्यातील दुष्काळी तालुक्यांच्या यादीत वरच्यास्थानी असलेल्या येवल्यात शेतकऱ्यांना वरदान ठरतो तो खरीप हंगाम. मात्र, हा हंगामही पूर्णपणे पावसावर अवलंबून असतो. तालुक्याचे जून ते ऑक्टोबर पर्यंतचे सरासरी पर्जन्यमान ५१२ मिलिमीटर आहे. इतका पाऊस झाला तर खरिपाची शाश्वती नक्कीच असते. मागील वर्षी ४२५ मिलिमीटर पाऊस पडल्यामुळे खरिपातील मका, कापूस, कांदे व इतर सर्वच पिके शेतातच करपून चारा झाला होता.

चालू वर्षी चांगला पाऊस या हेतूने हंगामाची तयारी सुरू झाली आहे. सर्व शेतकऱ्यांनी शेतीची नांगरणी करून ठेवली असून खरीप पूर्व मशागतीलाही सुरवात झाली आहे. मागील तीन-चार वर्षात मकाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली असून जिल्ह्यात नंबर एकवर येथे मका घेतली जाते. यावर्षीही मकासह स्थिर भाव राहणाऱ्या सोयाबीनचे क्षेत्र वाढते राहील.

तत्पूर्वी कपाशी तीन ते चार वर्ष बेभरवशाची झाल्याने कपाशीचे क्षेत्र घटले आहे. लाल कांदयाने गेले तीन वर्षे चांगली साथ दिल्याने यंदाही लागवडीचे क्षेत्र वाढीव राहील. पाऊस लवकर पडल्यास मुगाचे पीक घेऊन कांदा लागवड होईल आणि पाऊस लांबल्यास मुगाचे क्षेत्र कमी करून यात कांदा लागवड होऊ शकते.

Here the speed of pre-sowing tillage is applied.
Nashik Agricultural News: दुष्काळी मदत लांब, पीकविमाही मिळेना! येवल्यात 52 हजारांवर शेतकऱ्यांना प्रतीक्षा

बळीराजाची लगबग सुरु

मॉन्सूनच्या बातम्या येऊन धडकल्या असून वातावरणही बदलू लागल्याने शेतकऱ्यांना आता खरिपाची वेध लागले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर शेतकरी बी-बियाणे नियोजन व खते खरेदी करत आहे.जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने चांगली हजेरी लावल्यास तालुक्यातील शेतकरी मका लागवड व इतर पेरण्या सुरवात करतील. त्यादृष्टीने कृषी विभागाने देखील तयारी चालवली असून शेतकऱ्यांची जनजागृती पेरणीसाठी मार्गदर्शन बैठका होत आहे.

मागील वर्षी तालुक्यात टोमॅटोच्या लागवडीखालील क्षेत्रात घट झाली होती. मात्र सुरुवातीला मिळणाऱ्या भावामुळे या वर्षी मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागवडीसाठी शेतकऱ्यांनी रोपे बुक केली आहे. मागील दोन-तीन वर्षी लाल कांद्याला तेजी राहिल्याने यावर्षी शेतकरी लाल कांदे लागवडीला प्राधान्य देणार असल्याचे दिसतेय.

पूर्व मशागत,पेरणीचे नियोजन

तालुक्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ५४ हजार २३३ हेक्टरवर असून यात वाढ होत ७५ हजार ४०० हेक्टरवर खरीप पेरणीचे उद्दिष्ट आहे. खरीप हंगामावर शेतकऱ्यांची पुढील गणित अवलंबून असल्याने नांगरणी, फनणी, शेणखत पसरविणे, तण गोळा करणे या पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना गती आली आहे. तालुक्यात मका, मुग, सोयाबीन, कापुस, भुईमुग, तुर, उडीद आदी पिकांची खरीप हंगामात पेरणी होणे अपेक्षित आहे.

Here the speed of pre-sowing tillage is applied.
Nashik Agricultural Success: सदाबहार तैवान पेरूची शेती यशस्वी! पालखेड मिरची येथील शेतकऱ्याला एक एकरात 8 लाखांचा नफा

अशी होईल खरिपाची पेरणी..

पीक सर्वसाधारण क्षेत्र - मागील वर्षी पेरणी - प्रस्तावित क्षेत्र

ज्वारी ४ - ०० - ००

बाजरी ९७३० - ५३५६ - ५२००

मका ३५११९ - ४१३६८ - ४१४००

तूर ११२८ - १५८ - २००

मूग ५२४० - ९३१४ - ९३००

उडीद ५२५ - ३ - ०

भुईमुग २६१४ - १३६५ - १४००

सोयाबीन ४७१२ - १६३३७ - १६८००

कापूस ११०३९ - १२८३ - ११००

ऊस १९८ - २१ - ७०

एकूण ७०१११ - ७५१८५ - ७५४००

''कृषी विभाग शेतकऱ्यांना खरिपाच्या दृष्टीने मार्गदर्शन करत आहे.सोयाबीन बियाण्याचे ठिकठिकाणी प्रात्यक्षिके घेण्यात आली.खते व बी बियाणे उपलब्धतेचे नियोजन सुरू आहे. यावर्षी मका,सोयाबीन,कांद्याचे क्षेत्र वाढताना दिसेल.पिके व पेरणीविषयी माहितीसाठी शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.''- हितेंद्र पगार,मंडळ कृषी अधिकारी,येवला

Here the speed of pre-sowing tillage is applied.
Nashik Agriculture News : खरिपाची 6 लाख हेक्टरवर लागवड; जिल्ह्यात खतांचे 2 लाख 20 हजार टन आवंटन मंजूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.