'पूल बांधला हो, पण पाण्याची वणवण संपणार कधी?' आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर

नाशिक
नाशिकSakal
Updated on

नाशिक: नाशिकमधील आदिवासी भगिनी डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन लाकडी बल्ल्यांच्या आधाराने नदी पार करतानाची व्यथा 'सकाळ'ने मांडली होती. आदिवासी बांधवांच्या जगण्यातील दुःखांकडे कानाडोळा करणारे लोकप्रतिनिधी अन्‌ आदिवासींच्या जीवघेण्या कसरतींबद्दल अनभिज्ञ असलेले प्रशासन, अशा विचित्र प्रश्‍नांचा गुंता खरशेत (ता. त्र्यंबकेश्‍वर) ग्रामपंचायतीअंतर्गतच्या पाड्यांवरील कुटुंबांपुढे उभा ठाकला होता. ‘सकाळ’ने ही वेदना वृत्तांमधून मांडत, हा प्रश्‍न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला. अखेर ३० फूट खोल तास नदीवर जिल्हा परिषदेने लोखंडी पूल उभारण्यात आला. मात्र, एका प्रश्नाकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालं ते म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठीही इतकी वणवण या महिलांना आजही का करावी लागते आहे? याच प्रश्नावर आता पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलंय.

नाशिक
पाचपैकी ३ राज्यांमध्ये राष्ट्रवादी निवडणूक लढणार - शरद पवार

आदित्य ठाकरे यांनी आज ट्विट केलंय की, काही दिवसांपूर्वी आम्ही नाशिकच्या शेंद्रीपाडा-खरशेत येथे पाण्यासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या आदिवासी महिलांसाठी एक मजबूत पूल बांधला होता. आता यापुढे जाऊन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मला आश्वासन दिलंय की, येत्या 3 महिन्यात त्या वस्तीतील सर्व घरांना नळाद्वारे पाणी मिळेल.

इथल्या आदिवासी भगिनी पिण्याच्या पाण्याचे डोईवरून हंडे घेत या लाकडी बल्ल्याच्या आधारे ये-जा करत होत्या. पूल बांधल्यानंतर तिथल्या आदिवासी बांधवांनी लोखंडी पुलाचे पूजन केले. त्या वेळी ‘बजरंग बली की जय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा जयघोष करण्यात आला. दरम्यान, तास नदीवरील बल्ल्यांवरून पिण्याच्या पाण्याचे हंडे घेऊन रोज जीवघेणी कसरत करावी लागत असल्याचे छायाचित्र अन्‌ वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होताच, प्रशासन खडबडून जागे झाले. एरव्ही कुणीही अधिकारी पाड्याकडे फिरत नसायचे. मात्र अधिकारी-कर्मचारी पाड्यावर पोचले. पहिल्यांदा लोखंडी पूल करण्यासाठी मोजमाप घेत असताना दुर्घटना घडून आणखी प्रश्‍न चिघळू नये म्हणून बल्ल्या हटविल्या गेल्या.

नाशिक
"सोशल मीडियावर महिलांचा सन्मान राखला जात नाही" - स्मृती इराणी

बल्ल्या हटविल्यामुळे इथल्या आदिवासींना उड्या मारून एका काठावरून दुसरा काठ गाठावा लागत असताना भगिनींची रानोमाळ पाण्यासाठी भटकंती सुरू झाली. ही समस्या ‘सकाळ’मधून मांडली गेली अन्‌ त्याची दखल पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यापासून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्यापर्यंत सरकारदरबारी घेतली गेली आहे. आता या महिलांची पाण्यासाठीचीही वणवण थांबण्याचं आश्वासन मिळालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.