Kojagiri Pornima 2024 : सप्तशृंगगडावर तृतीयपंथीयांचा कोजागरीस जागर! राज्यभरातील तृतीयपंथीय दाखल; आज छबिना उत्सव

Kojagiri Pornima : तृतीयपंथीयांचा मेळा अर्थात छबिना उत्सव बुधवारी (ता. १६) पन्नास हजारांवर कावडीधारक, ७५ हजारांवर पदयात्रेकरू, हजारावर तृतीयपंथी व लाखावर सामान्य भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे.
Mahamandaleshwar Payalnandgiri, head of Tritiya Panthi Akhara while blessing the devotees.
Mahamandaleshwar Payalnandgiri, head of Tritiya Panthi Akhara while blessing the devotees.esakal
Updated on

वणी : स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर कोजागरी पौर्णिमा उत्सव, कावडयात्रा व सामान्य भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला तृतीयपंथीयांचा मेळा अर्थात छबिना उत्सव बुधवारी (ता. १६) पन्नास हजारांवर कावडीधारक, ७५ हजारांवर पदयात्रेकरू, हजारावर तृतीयपंथी व लाखावर सामान्य भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे. सप्तशृंगगडावर कोजागरी पौर्णिमेला तृतीयपंथीयांचा मेळा भरतो. (Kojagiri Jagar of transgender at Saptshringigarh Today Chabina Utsav)

या मेळ्यासाठी गडावर राज्यभरातील तृतीयपंथी दाखल होतात. गेल्या ३० वर्षांत तृतीयपंथीयांची सप्तशृंगगडावर कोजागरी पौर्णिमा उत्साहात अधिक प्रमाणात बघावयास मिळत आहे. या दिवशी लाखो भाविक आदिमायेच्या दर्शनाबरोबरच तृतीयपंथीयांचा आशीर्वाद घेण्यासाठी दाखल होऊ लागले आहेत.

तृतीयपंथीयांचा धार्मिक विधी

राज्यभरातील सर्व तृतीयपंथीयांच्या प्रमुखांनी स्वतंत्रपणे आपल्या शिष्यगणांसह शिवालय तलावावर स्नान करून सोबत आणलेल्या देवीच्या मूर्तींना शास्त्रोक्तपणे अभिषेक करतात. त्यानंतर गटप्रमुख अर्थात गुरूंना लिंब चढवून (लिंबाची पाने) शिवालय तलावालगत अर्धनारी नटेश्वरी देवीचा पूजाविधी करून दर्शन घेतात. त्यानंतर प्रत्येक गुरूला त्यांच्या शिष्यांनी दूध, चंदन, हळद, कुंकू तसेच गुलाबजल या पंचामृताने अभिषेक केला जातो.

पुढे सर्वांनी स्वत:चा साजशृंगार करून गटप्रमुखांची लिंब मिरवणूक अर्थात लिंबाची माळ, कडुलिंबाची माळ व इतर साजशृंगार करीत मंदिराच्या पहिल्या पायरीपर्यंत डफांच्या निनादात सवाद्य मिरवणूक काढण्यात येते. यात तृतीयपंथीयांसह सामान्य भाविक सहभागी होऊन नृत्य करीत गटप्रमुखांचा आशीर्वाद घेतात. सायंकाळी सातच्या सुमारास छबिना मिरवणुकीस प्रारंभ होता. (latest marathi news)

Mahamandaleshwar Payalnandgiri, head of Tritiya Panthi Akhara while blessing the devotees.
Kojagiri Pornima 2024 : कोजागिरी पौर्णिमेला एकमेकांची तोंड पाहत बसू नका, हे खेळ खेळा, नात्यातील गोडवा होईल द्विगुणीत!

प्रत्येक गटातील सदस्यांनी पुन्हा नथ, बाजुबंद, पाटल्या, कमरपट्टा, मोहनमाल, ठुशी, पुतळ्या, वज्रटीक, कोल्हापुरी हार, तोडे, तोळबंद्या, बुगड्या, कर्णफुले, गेंदफूल, जोडवे, मासुळ्या, आंगठुळे, करंगुळ्या, नाकीमोरण आदी अलंकारांनी साजशृंगार करून स्वतंत्रपणे छबिन्याची अर्थात सप्तशृंगी माता, यल्लमा माता व आपल्या कुलदेवीची मूर्ती तसेच सप्तशृंगी मातेस साजशृंगार, नैवेद्य, साडी-चोळी यांची सवाद्य मिरवणूक काढली जाते.

मिरवणुकीत भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या तृतीयपंथीय वाद्याच्या तालावर, त्यांच्यासोबत सामान्य भाविकदेखील ठेका धरत नृत्य करतात. मिरवणुकीचा शेवट पहिल्या पायरीवर होऊन सर्व गटप्रमुखांसह शिष्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन देवीचे दर्शन घेऊन सोबत आणलेली साडी-चोळी, नैवेद्य तसेच साजशृंगार देवीच्या चरणी अर्पण करून या भूतलावरील सर्व प्राणिमात्रांना सुखी ठेव, अशी प्रार्थना करून सप्तशृंगगडाचा निरोप घेतात.

दीक्षाविधी

छबिना मिरवणूक संपल्यानंतर गुरू शिष्यांचा रात्री मेळावा भरतो. यात त्यांच्या गुरूला शिष्याकडून भेट देण्याची परंपरा आहे. यात नवीन शिष्याला दीक्षा दिली जाते. दीक्षा विधी इच्छुक भाविकांचा चौक भरला जातो, देवीच्या मूर्तीला हळद-कुंकू लावले जाते. इच्छुक भाविकाला शुचिर्भूत करून, हळद लावली जाते व त्याला गुरूच्या उजव्या मांडीवर बसवून गुरुमंत्र दिला जातो. तृतीयपंथीयांसह सामान्य स्त्री-पुरुषदेखील ही दीक्षा घेऊ शकतात. यानंतर रात्रभर देवी भक्तिगीतांद्वारे जागर केला जातो.

Mahamandaleshwar Payalnandgiri, head of Tritiya Panthi Akhara while blessing the devotees.
Kojagiri Pornima : कोजागिरी पौर्णिमेला आपल्या प्रियजणांना पाठवा हे हटके मॅसेज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.