Nashik News : भारतीय जनता पक्ष सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात उभारलेल्या काही बंधाऱ्यांमध्ये पहिल्याच पावसाचे पाणी साचले आहे. मालेगाव, नांदगाव, चांदवड व येवला या भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणांमध्ये आतापासूनच पाणी साठण्यास सुरवात झाल्याने दुष्काळाच्या झळांची तीव्रता कमी झाली आहे. (Kolhapur type dams flooded in first rain Relief from drought)
ग्रामीण भागात वर्षभर पाणीसाठा उपलब्ध राहील, या उद्देशाने जलयुक्त शिवार योजनेंतर्गत गावागावांत छोटी-मोठी धरणे बांधण्यात आली. ठिकठिकाणी पाणी मुरण्यास मदत झाल्याने विहिरींना वर्षभर पाणी टिकून राहील, असा उद्देश या योजनेच्या मागे होता. २०१९ नंतर राज्यात सत्तांतर झाले आणि महाविकास आघाडीच्या कार्यकाळात ‘जलयुक्त शिवार’ गुंडाळण्यात आले. या कार्यकाळात एकही काम झाले नाही.
राज्यात सत्तांतर होताच भाजपने पुन्हा ‘जलयुक्त शिवार-२’ हा प्रकल्प हाती घेतला आणि जिल्ह्याचा आराखडा तयार केला. नाशिक जिल्ह्यात ५५ कामांसाठी १३ कोटी ५४ लाख ७५ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता २० ऑक्टोबर २०२३ ला मिळाली. यात नाला खोलीकरण, सिमेंट काँक्रिट बंधारा, कोल्हापूर टाइप बंधाऱ्याची उभारणी आदी कामांचा समावेश आहे.
ही कामे पूर्ण झाली असून, त्यात पाणी साठण्यास सुरवात झाल्याचे दिसून येते. नांदगाव तालुक्यातील नांदूर येथील बंधाऱ्यात पाणी साचल्याने आमदार सुहास कांदे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच मालेगाव, चांदवड, येवला या भागातील जलयुक्त कामांमुळे भूजल पातळीत वाढ होणार असल्याने भविष्यात तेथील शेतकऱ्यांना याचा निश्चितपणे फायदा होणार आहे.
"जलयुक्त शिवारच्या माध्यमातून झालेल्या कामांमुळे बहुतेक ठिकाणी पाणी साठल्याचे रिपोर्ट येत आहेत. जिल्ह्यात अजूनही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला नाही. संपूर्ण ठिकाणी पाऊस झाल्यावर धरणांची उपयुक्तता लक्षात येईल." - हरिभाऊ गिते, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी (मृद व जलसंधारण विभाग, नाशिक)
जलयुक्त शिवार अंतर्गत तालुकानिहाय कामे ः
त्र्यंबकेश्वर : हुंबाची मेट- ६५ लाख १८ हजार ७९१ रु.
खंबाळे - २९ लाख ६० हजार ८४० रु.
...
इगतपुरी : भरवीर बु.- १७ लाख ६९ हजार १६२ रु.
सोनोशी - ९० लाख ९५५ रु.
..
पेठ : सादडपाडा- ६४ लाख ३७ हजार ५८२
लव्हाळा- ४७ लाख ९७ हजार १३४
धुळघाट- ५२ लाख ९५ हजार २०१
...
निफाड : धारणगाव खडक- १४ लाख ११ हजार ७१८
धारणगाव खडक- १६ लाख ७८ हजार ९०५
देवगाव- १३ लाख १२ हजार ३४२
देवगाव- २४ लाख सहा हजार ७६७
डोंगरगाव- २६ लाख १३ हजार ४३०
चांदवड : वडनेर भैरव- १० लाख ६२ हजार ६१०
शिवरे- आठ लाख ३१ हजार ७०१
शिवाजीनगर- सहा लाख ४९ हजार ४९३
वाहेगाव साळ- १६ लाख २३ हजार ६१५
...
सिन्नर : निऱ्हाळे- १३ लाख ७७ हजार ६८५
वाडगाव- २१ लाख ७९ हजार ६७२
पिंपरवाडी- ५५ लाख ५५ हजार ९५९
...
येवला : भुलेगाव- २२ लाख तीन हजार ६७१
भुलेगाव- २५ लाख ६२ हजार ३१८
बदापूर- २६ लाख ७८ हजार २७०
..
कळवण : नवी बेज- ७७ हजार ६२४
विसापूर- दोन लाख २७ हजार १६४
ईशी- २९ लाख ५७ हजार ५००
नांदुरी- ६० लाख १३ हजार
..
दिंडोरी : जालखेड- ७२ लाख ४१ हजार ७५५
गोळशी- ८४ लाख १४ हजार ८४
सुरगाणा : अंबाठा- ६२ लाख ३२ हजार ७६१
..
देवळा : फुलेमाळवाडी- १५ लाख ६६ हजार २६१
सुभाषनगर- १३ लाख ३० हजार ८१५
गुंजाळनगर- सहा लाख ५९ हजार ४८२
..
मालेगाव : ज्वार्डी बु. व खुर्द- २७ लाख ६९ हजार ५००
झाडी- एक लाख ४६ हजार ८१६
सावकारवाडी- ९५ हजार
कंधाणे- एक लाख १० हजार ७३२
सावकारवाडी- एक लाख ८८ हजार ७२८
सावकारवाडी- एक लाख ४७ हजार ८०८
पोहाणे- तीन लाख ६६ हजार ९००
सावकारवाडी- एक लाख ६७ हजार ७७२
झाडी- नऊ लाख १३ हजार १६२
पोहाणे- १२ लाख ११ हजार २२८
...
बागलाण : मानूर- ७७ लाख दोन हजार ४९१
मानूर- ९१ लाख २८८
..
नांदगाव : मनमाड- ४५ लाख ७५ हजार ९४५
नांदूर- ४४ लाख ३६ हजार ६३७
पिंप्राळे- १८ लाख ९४ हजार ५८९
एकूण- ५५ कामांसाठी १३ कोटी ५४ लाख ७५ हजार ८६३ रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.