मालेगाव : महानगरपालिका हद्दीत कचरा संकलनाचा ठेका १५ सप्टेंबरपासून कोणार्क कंपनीला देण्यात आला आहे. सदर कंपनीने महिनाभरात बारा हजार मेट्रीक टनावर कचरा संकलित केला आहे. सुरवातीच्या सोळा दिवसात कंपनीने ६ हजार ७०० मेट्रीक टन कचरा उचलला.
सुका व ओला कचरा संकलित करण्यासाठी ९० घंटागाड्या व ४०० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. असे असले तरी शहरातील स्वच्छतेची घडी म्हणावी तशी बसलेली नाही. काही ठिकाणी अजूनही कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. (Konark picked up tons of garbage)