Nashik News : तिरंगी लढतीने प्रत्‍येक मताला येणार ‘मोल’; नाईक शिक्षण संस्‍थेचे 27 ला मतदान

Nashik : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्‍थेच्‍या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
Krantiveer Vasantrao Narayanarao Naik Educational Institution
Krantiveer Vasantrao Narayanarao Naik Educational Institutionesakal
Updated on

Nashik News : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्‍थेच्‍या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्‍यानुसार २७ जुलैला मतदान, तर २८ जुलैला मतमोजणीप्रक्रिया पार पडेल. यंदाच्‍या निवडणुकीत वारसा सभासदांपासून कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांभोवती निवडणुकीचा प्रचार रंगणार आहे. तीन पॅनल होण्याच्‍या शक्‍यतेने प्रत्‍येक सभासदाच्‍या मताला चांगले ‘मोल’ येणार आहे. (Naik Educational Institute Quinquennial Election on 27 july)

संस्‍थेतर्फे निवडणूक मंडळाची निवड करण्यात आली आहे. निवडणूक मंडळाचे अध्यक्ष ॲड. जालिंदर ताडगे, निवडणूक मंडळ सदस्य म्हणून ॲड. संतोष दरगोडे, एल. एम. ढाकणे यांची नियुक्‍ती झाली आहे. निवडणुकीसाठी ॲड. एस. जी. सोनवणे लवाद म्हणून काम पाहणार आहेत. या निवडीनंतर निवडणूक मंडळातर्फे ॲड. ताडगे यांनी निवडणूक कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली.

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळ निवडीसाठी पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. निवडणुकीच्‍या पार्श्वभूमीवर शेवटची वार्षिक सर्वसाधारण सभा गाजली होती. कथित भ्रष्टाचाराच्‍या मुद्द्यावर हाणामारीपर्यंत विषय पोचला होता. त्‍यानंतर नुकताच काही दिवसांपूर्वी मृत सभासदांच्‍या वारसांना सभासदत्‍व देण्यासाठीची विशेष सभादेखील निष्फळ ठरली होती.

या पार्श्वभूमीवर निवडणुकीत हे मुद्दे गाजणार आहेत. त्‍यातच विद्यमान अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांच्‍यासह माजी अध्यक्ष कोंडाजीमामा आव्‍हाड आणि विद्यमान सरचिटणीस हेमंत धात्रक असे तीन पॅनल निवडणुकीच्‍या रिंगणात उतरणार असल्‍याची दाट शक्‍यता असल्‍याने प्रत्‍येक मताला मोल येणार आहे. (latest marathi news)

Krantiveer Vasantrao Narayanarao Naik Educational Institution
Nashik News : वीरगावच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा; जिल्हा परिषद आरोग्य विभागाने बजावली नोटीस

निवडणूक ठरणार राजकीय आखाडा

यंदाच्‍या निवडणुकीत माजी जिल्‍हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कोंडाजीमामा आव्‍हाड, भाजप पदाधिकारी हेमंत धात्रक असणार आहेत. आत्तापर्यंत राजकारणात सक्रिय असलेले माजी आमदार बाळासाहेब सानप, तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उदय घुगे यांच्‍याकडूनही पॅनलनिर्मितीच्‍या हालचाली सुरू असल्‍याने ही निवडणूक राजकीय आखाडा ठरणार आहे.

...या पदांसाठी होईल निवडणूक

अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, सहचिटणीस, सहा विश्वस्त, तसेच नाशिक शहर, तालुका व इगतपुरी तालुका ४ संचालक, सिन्नर- ३ संचालक, निफाड-चांदवड ३ संचालक, येवला-मालेगाव २ संचालक, नांदगाव, बागलाण व कळवण २ संचालक, दिंडोरी, पेठ व सुरगाणा ३ संचालक आणि २ महिला संचालिका, असे एकूण २९ सदस्यांची कार्यकारी मंडळाची मतदानाने निवड होईल.

- जिल्‍हाभर संस्‍थेचा विस्‍तार

- जिल्ह्यात संस्‍थेच्‍या सत्तर शाखा

- आठ हजार ६९२ सभासद मतदार

Krantiveer Vasantrao Narayanarao Naik Educational Institution
Nashik News : 6 महिन्यात 5 हजार अवजड वाहनांवर कारवाई; मालेगाव वाहतूक पोलिसांकडून 56 लाखांचा दंड वसूल

असा आहे निवडणूक कार्यक्रम

- मतदारांची प्राथमिक यादीची प्रसिद्धी - २ जुलै, स. ११ वा.

- मतदार यादीबाबत हरकती स्वीकारणे - २ ते ५ जुलै

- मतदारांची अंतिम यादी प्रसिद्धी - ५ जुलै, सायं. ५

- उमेदवारी अर्ज वितरण व स्वीकारणे - ६ ते ९ जुलै

- उमेदवारी अर्ज छानणी - १० जुलै, दु. ३ वा.

- पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्धी - १० जुलै

- उमेदवारी अर्ज माघारीची मुदत - ११ ते १३ जुलै

- उमेदवारांना निशाणीचे वाटप - १३ जुलै, सायं. ६ वा.

- मतदानाची तारीख - २७ जुलै, स. ८ ते सायं. ५

- मतमोजणी - २८ जुलै, सकाळी ८ पासून

Krantiveer Vasantrao Narayanarao Naik Educational Institution
Nashik News : ब्रँडेड उत्पादकांकडून कीटकनाशकांचा वापर नाही; महाराष्ट्र मसाला उद्योग संघटनेचा दावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.