किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा
Nashik Krishithon 2023: जनावरांसाठी साठवलेला चारा पावसामुळे खराब होण्याची किंवा त्याला आग लागण्यासारख्या घटनांवर मुरघास बॅग हा प्रभावी उपाय ठरणार आहे. एका बॅगमध्ये तब्बल वर्षभराचा चारा साठविला जाऊ शकतो.
विशेष म्हणजे, हा चारा ऊन, वारा अन् पावसापासूनही वाचविणे शक्य असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान टाळणे शक्य झाले आहे. (Nashik Krishithon 2023 Agriculture Company made Samruddhi Murghas Bag nashik news)
राज्यासह जिल्ह्यावर यंदा दुष्काळाचे सावट आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील पिके करपून गेल्याने बहुतांश ठिकाणी चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. ज्या ठिकाणी पाऊस झाला आहे, अशा भागातून मक्याच्या चाऱ्याची ट्रॅक्टरद्वारे वाहतूक केली जाते.
उघड्यावर होणारी वाहतूक किंवा साठवलेल्या चाऱ्याला आग लागण्याची शक्यता असते. पाऊस आला तरी तो खराब होऊ शकतो. यावर उपाय म्हणून सांगोला तालुक्यातील (जि. सोलापूर) गंगाप्रसाद पाटील यांच्या लिनिअर ॲग्रीकल्चर कंपनीने समृद्धी मुरघास बॅग बनवली आहे.
या बॅग सध्या ‘कृषिथॉन’मध्ये चर्चेचा विषय ठरल्या आहेत. यात ५० किलोपासून पाच टनापर्यंतच्या चाऱ्याची कुट्टी (बारीक तुकडे) करून या बॅगेत साठविता येते. विशेष म्हणजे या बॅगला आतून प्लास्टिकचे आवरण असल्याने पावसात हा चारा भिजत नाही.
सहा फूट रुंद आणि सहा उंच अशी ही बॅग छोट्याशा जागेतही उभी राहू शकत असल्याने दूध देणारी गाय, म्हैस आदी जनावरांचा वर्षभराचा चारा यात साठविला जाऊ शकतो.
"वर्षभराचा चारा कसा साठवायचा, याविषयी शेतकऱ्यांना चिंता असते. समृद्धी मुरघास बॅगमध्ये पावसाळ्यातही चारा कुट्टी करून साठविला जाऊ शकतो. त्याचा शेतकऱ्यांना निश्चितपणे फायदा होईल." - गंगाप्रसाद पाटील, संचालक, लिनिअर ॲग्रीकल्चर प्रा. लि.
मुरघास बॅगची वैशिष्ट्ये
- व्हर्जीन प्लास्टिकपासून निर्मिती
- बॅगचे तुकडे होत नाहीत
- ५० किलो ते पाच टनांपर्यंत साठवण क्षमता
- गोलाकार भरत असल्याने बॅगमध्ये जास्त माल बसतो
- पांढऱ्या रंगाची बॅग असल्याने उष्णता शोषत नाही
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.