नाशिक : देशातील शेतकऱ्यांपुढे नैसर्गिक आणि कृत्रिम संकटे निर्माण होतात. त्यावर मात करण्यासाठी कृषिथॉनसारख्या प्रदर्शनातून शेतकऱ्यांना ताकद आणि मार्गदर्शन मिळते, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी (ता. २५) येथे केले.
ह्यूमन सर्व्हिस फाउंडेशन व मीडिया एक्झिबिटर्सतर्फे ठक्कर डोममध्ये भरलेल्या प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात श्री. थोरात यांच्या हस्ते युवा सन्मान, युवा शेतकरी, उद्योजक, कार्यविस्तार पुरस्कार प्रदान करण्यात आले.
त्या वेळी ते बोलत होते. स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्रामीण महाव्यवस्थापक सत्यप्रकाश झा, माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, कृषिथॉनचे आयोजक संजय न्याहारकर, अश्विनी न्याहारकर, साहिल न्याहारकर, संजय पाटील, माजी नगरसेवक डॉ. हेमलता पाटील, वत्सलाताई खैरे, ज्ञानेश्वर गायकवाड, राहुल दिवे आदी उपस्थित होते. (Nashik Krushithon Exhibition Farmers get power to overcome difficulties from Krushithon Nashik News)
श्री. थोरात म्हणाले की, शेतकऱ्यांच्या विकासासाठी विधायक कार्य करावे, या प्रेरणेतून कृषिथॉन प्रदर्शनाचे आयोजक न्याहारकर हे गेल्या २४ वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. देशातील छान कृषी प्रदर्शन आहे. सध्याच्या काळात शेतकऱ्यांकडून भात, ऊस, बांबू, डाळिंब, द्राक्ष, आंबा, केळी, कापूस, सोयाबीन, मोसंबी अशी विविध प्रकारची पिके राज्यातील अनेक भागात घेतली जातात. या पिकांना भाव मिळणे गरजेचे आहे.
तसेच नाशिक जिल्ह्यातील शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग व संशोधन करत जणूकाही कृषी विद्यापीठाचे कार्य करत असतात. याशिवाय फळबागा, फुलबागा, भाजीपाला, कांदा अधिक क्षेत्रात नाशिक जिल्ह्याने अग्रक्रम मिळविला आहे. यापुढे कोणत्याही पिकावर औषध फवारणी करणे म्हणजे मानवी आरोग्याला घातक ठरणारे आहे. त्यामुळे विषमुक्त पिकांना मागणी असणार आहे. सहाजिकच सेंद्रिय शेतीला मोठ्या प्रमाणावर संधी असून, त्यासाठी नाशिक, नगर, जळगावसह पश्चिम महाराष्ट्र आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत. साहिल न्याहारकर यांनी प्रास्ताविक, तर अश्विनी न्याहारकर यांनी स्वागत केले. किरण सोनार यांनी सूत्रसंचालन केले. सतीश पाटील यांनी आभार मानले.
हेही वाचा :मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....
सन्मानित करण्यात आलेले पुरस्कारार्थी
- युवा शेतकरी : आकाश म्हसकर (जळगाव), दीपक वराडे (जालना), ज्ञानेश्वर रेवगडे (सिन्नर), ज्ञानेश्वर दराडे (नगर), गणेश चव्हाण (निफाड), जगन्नाथ घोडे (इगतपुरी), किरण बुराके (निफाड), कृष्णदेव कळंबे (वाई), नितीन गायकर (गिरणारे), पवन पगारे (मालेगाव), प्रशांत दाते (लाखलगाव), राहुल कदम (साक्री), शिवाजी घावटे (औरंगाबाद), सुजित बनकर (उंबरखेड), सुखजितसिंग भंगू (पंजाब).
- युवा उद्योजक : अक्षय सांगळे (नाशिक), अंकिता काल्या, बापू घळके, साईनाथ तळेकर, संदीप उफाडे, शुभम आणि नमन डुंगरवाल, गजेंद्र चौधरी, विजय उगले.
- कार्यविस्तार : डॉ. शरद नायक, हर्षल पाटील (इंडोफिल), राहुल कळसकर, रोहन लोखंडे, संजय पवार, विजय शेडगे, विलास पवार (सायखेडा).
द्राक्षबागांचे व्यवस्थापन अन् दर्जेदार मालाची निर्यात
‘कृषिथॉन’मध्ये दुपारच्या सत्रात द्राक्षबागांचे योग्य व्यवस्थापन आणि दर्जेदार मालाच्या विक्रीसाठी स्थानिकसह देशांतर्गत व परदेशी बाजारपेठेतील निर्यातीचे योग्य नियोजन केल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो, असा सूर राहिला. ‘प्रश्न द्राक्ष उत्पादकांचे मार्गदर्शक तज्ज्ञांचे’ हा परिसंवाद झाला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, राज्य द्राक्षबागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले, निफाडचे उपविभागीय कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते. दाभोलकर प्रयोग परिवाराचे जिल्हा मुख्य समन्वयक वासुदेव काठे, सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक मंगेश भास्कर, ग्रेप मास्टर सेंद्रिय शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील शिंदे, फरटेली फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष अनंत मोरे, एकेसिटी क्रॉप सोल्युशनचे संचालक अरविंद खोडे, ‘अपेडा‘चे लोकेश गौतम, हेमंत ब्रह्मेचा आदींनी उपस्थितांशी संवाद साधला. डावणीच्या व्यवस्थापनाबद्दल श्री. भास्कर यानी माहिती दिली.
द्राक्ष निर्यातीसाठीच्या प्रयत्नांबद्दल सुनील शिंदे यांनी माहिती दिली. हिरवळीच्या खताचा वापर, जमिनीची सुपीकता याविषयी श्री. काठे यांनी मार्गदर्शन केले. श्री. मोरे, श्री. खोडे यांनी द्राक्ष उत्पादकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. श्री. गौतम यांनी सरकारी योजनांची माहिती दिली. या वेळी अनंत मोरे, अरविंद खोडे, किरण पिंगळे, हेमंत ब्रह्मेचा, राहुल रसाळ, उत्तम बोरणारे, विनायक मोरे, दत्तात्रय चव्हाण, हर्षवर्धन बागल, बापू साळुंखे, रोहिदास पाटील यांचा सन्मान करण्यात आला. तसेच किशोर कातोरे, प्रमोद देशमुख, मनोज जाधव, श्रीकांत पवार यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. तुषार उगले यांनी प्रास्ताविक केले. आदित्य यांनी सूत्रसंचालन केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.