Nashik Kumbh Mela Dates Shahi Snan Godavari River
नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत, असा एक मेसेज मंगळवारी नाशिक आणि परिसरात व्हायरल झाला. ३१ ऑक्टोबर २०२६ ते २४ जुलै २०२८ या कालावधीत कुंभमेळ्यातील धार्मिक उपक्रम संपन्न होणार आहेत, असं मेसेजमध्ये नमूद करण्यात आलेलं होतं. मुळात हा मेसेज चुकीचा असल्याचं निष्पन्न झालं आहे.
गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी या व्हायरल मेसेजबद्दल सांगितलं की, हा मेसेज चुकीचा आहे, अशा तारखा जाहीर झालेल्या नाहीत. नाशिकच्या कुंभमेळ्याबद्दल ज्येष्ठांशी बोलून निर्णय घेतला जाणार आहे. उज्जैनच्या कुंभमेळ्यात नाशिकच्या शाही स्नानाच्या तारखा जाहीर करु, असं शुक्ल यांनी सांगितलं.
३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजारोहण होणार तर २४ जुलै २०२८ रोजी ध्वजावतरण होणार, असा फेक मेसेज व्हायरल झाला होता.
(Nashik-Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela)