Nashik Kumbh Mela Preparation: रस्ते विकास महामंडळ करणार रिंगरोड

NMC Nashik News
NMC Nashik Newsesakal
Updated on

Nashik Kumbh Mela Preparation : सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यभार पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी महापालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर बाह्यवळण रस्ता तयार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या निर्णयामुळे महापालिकेला दिलासा मिळणार असून, रिंगरोडसाठी खर्च होणारा वेळ व पैसा अन्य कामांकडे वळविला जाणार आहे. (Nashik Kumbh Mela Preparation Road Development Corporation will make ring road nashik)

आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेकडून बाह्यवळण रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. साठ मीटर रुंदीचा रिंगरोडसाठी १५८ हेक्टर, तर ३६ मीटर रिंगरोडसाठी १०९ हेक्टर जागा संपादित करावी लागणार आहे.

६० मीटर रुंदीचा बाह्यवळण रस्ता पाथर्डी ते आडगाव दरम्यान अंतर ३६ मीटरचा आडगाव ते गरवारे पॉइंट यादरम्यान राहणार आहे. रिंगरोड तयार करण्यासाठी जवळपास २७० हेक्टर जमीन लागणार आहे.

परंतु भूसंपादन करण्यासाठी महापालिकेकडे पैसे नाही. त्यामुळे टीडीआरचा प्रस्ताव समोर येत आहे. जवळपास एकास तीन असा प्रोत्साहनपर टीडीआर दिला तरी महापालिकेला परवडणार नाही.

त्याला कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात बाजारात टीडीआर उपलब्ध होऊन टीडीआरचे भाव गडगडतील. त्यामुळे टीडीआर घेण्यास कोणीही तयार होणार नाही. त्यामुळे रिंगरोडसाठी भूसंपादन करताना व भूसंपादनावर आर्थिक मोबदला किंवा टीडीआर स्वरूपात मोबदला देताना महापालिकेला मोठे कसरत करावी लागणार.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC Nashik News
SAKAL Impact: अखेर नळावाटे पिण्यायोग्य पाणी; NMC पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी सुटीच्या दिवशी शोधला दोष

ही बाब ओळखून पालकमंत्री व नव्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यभार स्वीकारलेले दादा भुसे यांनी नाशिक महापालिकेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यात महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून ९६ किलोमीटरचा रिंगरोड तयार केला जाणार आहे.

प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना

सार्वजनिक बांधकाम मंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नाशिकच्या प्रकल्पात संदर्भात दादा भुसे यांनी चर्चा केली. त्यात महापालिकेला रिंगरोडसाठी भूसंपादन परवडणारे नसल्याची बाब प्रकर्षण आणि समोर आली.

सिंहस्थासाठी रिंग रोड आवश्यक्य असल्याने हा रस्ता महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फतच व्हावे व त्यासाठी महापालिकेला प्रस्ताव करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्याअनुषंगाने महापालिकेकडून प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुढील आठवड्यात बैठक होण्याची शक्यता आहे.

NMC Nashik News
NMC News: मनपाचा पेट्रोलपंप पुन्हा कार्यान्वित!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.