Nashik News : बांधकाम कामगार अधिनियमानुसार बांधकाम कामगारांना पेन्शन देण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे. त्याबाबत शासन सकारात्मक आहे. बांधकाम पेन्शनच्या प्रस्तावावर शासन स्तरावर पडताळणी सुरू आहे. पेन्शनबाबत आयटक संघटना ही सातत्याने प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन नाशिक विभाग कामगार उपायुक्त विकास माळी यांनी केले. ते आयटक अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयटकचे जनरल सेक्रेटरी कॉ. शाम काळे उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी आयटकचे राज्य सचिव कॉ. राजू देसले हे होते. (Government positive for pension for construction workers )