नाशिक : आनंदवल्ली परिसरातील बेंडकुळे नगरमध्ये नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असताना एका सदनिकेच्या खिडक्यांना लोखंडी ग्रील बसविताना फॅब्रिकेशन मजुराला चक्कर आली आणि तो तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. या दुर्दैवी घटनेत या मजुराचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सतत घडणाऱ्या या घटनांमुळे शहरातील बांधकाम क्षेत्राच्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Nashik Labourer dies marathi news)
नामदेव विठ्ठल कासव (३९, रा. दीपज्योती अपार्टमेंट, हनुमानवाडी, पंचवटी) असे मृत मजुराचे नाव आहे. कासव हे ठेकेदारी पद्धतीने फॅब्रिकेशन आणि स्लायडींगचे काम करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. रविवारी (ता.१०) दुपारी चार वाजता आनंदवल्लीतील आदिराज ब्लॉसम या नवीन बहुमजली इमारतीच्या साइटवर तिसऱ्या मजल्यावरील सदनिकांच्या खिडक्यांना ग्रील बसविण्याचे काम ते करीत होते.
त्यावेळी त्यांना अचानक चक्कर आली आणि ते तिसऱ्या मजल्यावरून थेट खाली कोसळले. या दुर्घटनेमध्ये त्यांच्या डोक्यास व पाठीस जबर दुखापत झाल्याने त्यांना तत्काळ अक्षय कासव यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. पगार यांनी तपासून मृत घोषित केले. गंगापूर पोलिस तपास करत आहेत. (Latest Marathi News)
दरम्यान, गेल्या आठवड्यात तीन ते चार वेगळवेगळ्या घटनांत चार बांधकाम कामगारांचा मृत्यू झाला आहे. संबंधित बिल्डर, ठेकेदार व मेंटेनन्स करणाऱ्या कंपन्यांनी मजुरांच्या जिवाची पर्वा न करता निष्काळजीपणा दाखवत त्यांना जीवनावश्यक सुरक्षा साधने पुरविली नसल्याने या कामगारांना नाहक जीव गमवावे लागल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. काही प्रकरणात पोलिसांनी संबंधितांवर गुन्हेही नोंदविलेले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.