Nashik News : बनावट नोटांचा तपास ‘गुलदस्त्यात’; पोलिस तपासामध्येच असमन्वयाचा अभाव

Nashik : आठवड्यात उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन महिलांकडून १० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या.
fake note
fake note esakal
Updated on

Nashik News : मागील आठवड्यात उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन महिलांकडून १० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. या गुन्ह्यातून बनावट नोटांचे मोठे रॅकेट हाती लागण्याची शक्यता होती. परंतु तपासामध्ये एकापेक्षा अधिक पोलिस पथके सामील झाल्याने त्यांच्यातच असमन्वय झाल्याने तपासाची दिशा भरकटल्याची चर्चा होवू लागली आहे. उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुक्तिधाम परिसरामध्ये संशयित महिला स्वाती आहिरे आणि पूजा कहाने या दोघींना सापळा रचून गुन्हेशाखेने अटक केली होती. (Nashik Lack of coordination in police investigation of fake notes)

संशयित महिलांकडून ५०० रुपयांच्या बनावट २० नोटा आढळून आल्या होत्या. या नोटा बाजारात चलनात आणण्यासाठी गृहिणी असलेल्या संशयित महिलांचा वापर करण्यात आला होता. तर दोन दिवसांपूर्वीच, अंबड पोलिसांनी बनावट नोटाप्रकरणी टोळी गजाआड केली होती. या दोन्ही घटना पाहता, शहरात बनावट नोटांचा सुळसुळाट होऊन बाजारात बनावट नोटा आल्याचा संशय व्यक्त केला जात होता. त्या पार्श्वभूमीवर बनावट नोटांचे मोठे रॅकेटच शहरात कार्यरत असल्याची चर्चा होती.

उपनगरच्या बनावट नोटांच्या तपासातून हे रॅकेट हाती लागण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली होती. परंतु या घटनेला आठवडा उलटूनही पोलिसांच्या हाती काहीही ठोस लागू शकलेले नाही. गृहिणी असलेल्या दोन्ही संशयित महिलांकडे बनावट नोटा आल्या कोठून, त्यांना त्या कोणी दिल्या, याचाही देखील अद्यापपर्यंत उलगडा होऊ शकलेला नाही. यामागे, तपास पथकातून समन्वयाचा अभाव असल्याचे समोर येते आहे. (latest marathi news)

fake note
Nashik News : आश्रमशाळांत पहिल्याच दिवशी गणवेश; ‘आदिवासी विकास’कडून खरेदी

कारवाईपासूनच साशंकता

उपनगर हद्दीतील बनावट नोटासंदर्भातील खबर गुंडाविरोधी पथकाच्या अंमलदारास मिळाली होती. तर कारवाई शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने केली. कारवाईनंतर गुन्हा उपनगर पोलिस ठाण्यात दाखल झाला. एका कारवाईमध्ये गुंडाविरोधी पथक, युनिट दोन सहभागी झाले. मात्र याची खबर युनिटच्या प्रमुखांनाच नव्हती. गुन्हा ज्या पोलिस ठाण्यात झाली त्यांनाही यासंदर्भात पुरेशी माहिती नाही.

विशेषत: ज्या अधिकाऱ्याने कारवाई केली तो अधिकारी निवडणूक बंदोबस्तासाठी आलेला असताना त्यास सदरची कारवाई करण्यास सांगण्यात आल्याचे समजते. यावर कडी म्हणजे, या गुन्ह्याचा तपास कोण करीत आहे, याची कोणतीही कल्पना या अद्यापपर्यंत कोणालाही नाही. त्यामुळे ही कारवाईच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

fake note
Nashik News : आपत्ती निवारणासाठी 166 कोटींचे प्रस्ताव; जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.