SAKAL Exclusive : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा मॉडेल केल्या जात असताना दुसरीकडे जिल्ह्यातील १२६ प्राथमिक शाळांना स्वच्छतागृहांची (शौचालयांची) आवश्यकता आहे. यातील काही शाळांना शौचालय नाही, तर काही शाळांच्या शौचालयाची दुरवस्था झाली असून, मोडतोड झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाने स्वच्छता मिशन विभागांतर्गत १२६ शौचालयांची मागणी नोंदविण्यात आली आहे. यात सुरगाणा तालुक्यातील सर्वाधिक २९ शाळांनी शौचालयाची मागणी नोंदविली आहे. (Lack of toilets in 126 schools of Zilla Parishad in district )