Ladki Bahin Yojana : महिलांमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत जिल्ह्यातील एक लाख ४४ हजार महिलांनी ऑफलाइन व ऑनलाइन स्वरूपात अर्ज दाखल केले आहेत. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापर्यंत पंधराशे रुपयांची भेट मिळणार आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत असल्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी यात सहभागी होण्याचे आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. (Dada Bhuse statement of presents 1500 to sisters till Rakshabandhan)
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. १५) झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर यांसह जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.
पालकमंत्री भुसे म्हणाले, की राज्यातील महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, त्यांच्या सशक्तीकरणास चालना देणे, या उद्देशाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना १ जुलैपासून प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. योजनेच्या अंमलबजावणीसाठी तालुका, विधानसभा क्षेत्र पातळीवर समिती स्थापन करण्याची सूचना त्यांनी केली. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे. त्यामुळे कोणाचीही अडवणूक करू नये. चुकीचे काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. (latest marathi news)
वयोश्री योजनेचाही आढावा
ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय जीवनात आणण्यासाठी व त्यांना मोकळेपणाने जगता यावे, यासाठी राज्य शासनातर्फे मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांचे कौटुंबिक व मानसिक स्वास्थ्य अबाधित राहील. शासकीय यंत्रणांनी टीम वर्कद्वारे अधिकाधिक गरजूंना या योजनेचा लाभ द्यावा, असे निर्देश पालकमंत्री भुसे यांनी या वेळी दिले.
दाखल झालेले अर्ज
विभाग....................ऑफलाइन..........ऑनलाइन..........एकूण
महापालिका...........१०, ६६०.............१०३६....................११, ६९६
नगर परिषद............६७६२....................११२३.....................७८८५
जिल्हा परिषद........८२९१९.................४१६४४................१,२४,५६३
एकूण .........एक लाख ३४१.........४३,८०३..............एक लाख ४४ हजार १४४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.