Nashik News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी महिलांनी सादर केलेल्या ऑफलाइन अर्जाचा फोटो काढून तो ऑनलाइन अपलोड केल्यास हा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच गावासह शहरातील स्वस्त धान्य दुकानात ऑफलाइन अर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे. (Ladki Bahin Yojana)
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची आढावा बैठक शुक्रवारी (ता. १२) जिल्हाधिकारी शर्मा यांनी ऑनलाइन स्वरूपात घेतली. या वेळी महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पुरवठा निरीक्षक.
संरक्षण अधिकारी, तसेच प्रातिनिधीक स्वरूपात अर्ज ऑनलाइन अपलोड करणाऱ्या सेविका, सेतू केंद्र डाटा ऑपरेटर उपस्थित होते. जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी प्रभावी व सुलभ होण्यासाठी सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या पती, पत्नी व त्यांची अविवाहित मुले, मुली अशी ग्राह्य धरण्यात आली आहे.
नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशनकार्डवर लगेच लावणे शक्य नसल्याने विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. (latest marthi news)
परराज्यात जन्म झालेल्या व सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच महिलेच्या पतीचे १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड अथवा मतदान कार्ड हे सुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे. या योजनेच्या लाभासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरले जात आहे.
महत्त्वाच्या सूचना
-एकही महिला योजनेपासून वंचित राहता कामा नये
-अर्ज करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत
- अर्ज भरण्याची प्रक्रिया विनामूल्य
- येत्या दोन दिवसात स्वस्त धान्य दुकानात योजनेचे अर्ज
-गावपातळीवर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती
- ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंद
- बालवाडी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रामार्फत अर्ज
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.