Nashik News : भगूर इगतपुरी रस्त्यावर वंजारवाडी रेल्वे गेट येथे दोन महिन्यापूर्वी तयार केलेला अंडरपास हा एका पावसातच संपूर्ण पाण्याने भरून गेला आहे. यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान तर झालेच अन् नागरिकांना पुन्हा रेल्वे रुळावरूनच जीव मुठीत घालून क्रॉसिंग करावा लागत आहे. नागरिकांचा वेळ वाचावा, त्यांना ताटकळत रेल्वे क्रॉसिंगवर वाट बघावा लागू नये या उद्देशाने रेल्वे विभागाने सदर अंडरपास केला आहे. ( lake became underpass in one rain loss of lakhs due to wrong construction )
मात्र एकाच पावसामध्ये हा अंडरपास पूर्ण पाण्याने भरून गेल्यामुळे रेल्वेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या अंडरपासच्या अगोदर रेल्वे क्रॉसिंगवर ताटकळत नागरिकांना उभे राहावे लागत असे. सदर रेल्वे लाइनही मध्य रेल्वेची असून येथून कायम रेल्वे गाड्यांची ये-जा सुरू असते. त्यामुळे किमान दहा पंधरा मिनिटे गेट उघडले जात नाही किंवा एका मागोमाग एक ट्रेन येत असतात. त्यामुळे अधिक विलंबही लागतो. (latest marathi news)
ज्या हेतूने हा अंडरपास तयार करण्यात आला होता. तो हेतू साध्य झालेला दिसत नाही. वंजारवाडी, लोहशिंगवे, भगूर, लहवित हा परिसर नाशिक शहराच्या जवळ आहे. त्यामुळे रोज नोकरी, व्यवसाय व शाळा, कॉलेज यानिमित्ताने प्रवास करणाऱ्या नागरिकांची व विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सर्वांना वेळेवर आपल्या इच्छितस्थळी पोचायचे असते. मात्र सकाळी रेल्वे गाड्यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे प्रवाशांना क्रॉसिंगवर बराच वेळ वाट बघावा लागते. .
''रेल्वे हे देशातील महत्त्वाचे एक खाते आहे. इतकी मोठी यंत्रणा असलेल्या विभागाकडून असा निष्काळजीपणा अपेक्षित नाही. त्यांच्या बांधकाम विभागाकडून निश्चित चूक झालेली आहे. नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. लवकरात लवकर या समस्येवर रेल्वे विभागाने उपाय काढावा.''- राजेश जाधव, प्रवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.