State Excise Department : राज्य उत्पादन शुल्ककडून आर्मीसाठीचे लाखोंचे मद्य जप्त!

Nashik News : राज्य उत्पादन शुल्ककडून लेखा नगर येथे ११ लाखाहून अधिक किमतीचा मिलिटरीसाठी वापरला जाणारा अवैध मद्यसाठा वाहतूक करताना जप्त करण्यात आला.
State Excise Department
State Excise Departmentesakal
Updated on

Nashik News : राज्य उत्पादन शुल्ककडून लेखा नगर येथे ११ लाखाहून अधिक किमतीचा मिलिटरीसाठी वापरला जाणारा अवैध मद्यसाठा वाहतूक करताना जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे यामध्ये सर्वाधिक स्कॉच या व्हिस्कीचा समावेश आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आर्मीसाठी वापरण्यात येणारे मद्य कारमधून वाहतूक होणार आहे, असे समजले. (Nashik Lakhs of alcohol seized for Army from State Excise)

राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने शिवाजी महाराज पुतळ्यासमोर लेखा नगर येथे पांढऱ्या रंगाची कार तपासणीसाठी थांबविली. त्यामध्ये मद्यसाठा आढळून आला. वाहन चालक विकी सुधीर बटाविया याची चौकशी केली असता हा मद्यसाठा घरी घेऊन चाललो आहे, असे त्यांनी सांगितले. राज्य उत्पादन शुल्कच्या टीमने त्याच्या घरी जी-१.

सी विंग, श्रीजी लक्झरीया भुजबळ फार्ममागे, काशीको नगर येथे त्यास घेऊन गेले. संशयित इसमाचे घरी झडती घेतली असता आणखी अवैध मद्यसाठा आढळला. यामध्ये ब्लू लेबल, चिवास रिगल, बॅलेंटाईन, रॉयल सॅल्यूट, जॉनी वॉकर, मंकी सोल्जर, रॉयल ब्रेकला स्कॉच. (latest marathi news)

State Excise Department
Nashik Inspirational Story : खचलेल्या मनांसाठी ‘आयडॉल’ बनलेल्या सासू-सून

ग्लेनफिडीच, बेलमोर अशा अतिमहाग ब्रँडचे मद्य आढळले. यामधील काही मद्यसाठा हा दादरा नगर हवेली व दिव दमन या केंद्रशासित प्रदेशात विक्रीसाठी व महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेलाही आढळला.

जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत ११ लाख ५८ हजार २३१ रुपये आहे. मद्य विनापरवानगी बाळगल्या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. अधिक तपास राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक आर जे पाटील करीत आहेत.

State Excise Department
Nashik ZP News : दिव्यांग पडताळणी न केलेले 69 कर्मचारी कारवाईच्या कचाट्यात! जिल्हा परिषद प्रशासन खडबडून जागे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.