लासलगाव (जि. नाशिक) : आशिया खंडातील कांद्याची प्रसिद्ध असलेली बाजारपेठ लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ७५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच बदल करत अमावस्येच्या दिवशीही आता कांद्याचे लिलाव सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याची माहिती सभापती सुवर्णा जगताप आणि लासलगाव व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार डागा यांनी दिली. (lasalgaon market committee has taken a historic decision to start onion auction on amavasya)
कांदा म्हटले की, चटकन तोंडात नाव येते ते लासलगावचे. मग ते गल्लीपासून दिल्लीपर्यंत असो. शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारतर्फे प्रत्येक राज्यांमध्ये बाजार समितीची राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली स्थापना करण्यात आली. १ एप्रिल १९४७ मध्ये लासलगाव बाजार समितीची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत ७५ वर्षांपासून एक परंपरा अवलंबली जात होती. ती म्हणजे दर महिन्याच्या अमावस्येला कांदा व धान्याचे लिलाव बंद ठेवण्याची. ही परंपरा का आणि कशासाठी अवलंबली जात होती याचे कोणाजवळही उत्तर नव्हते. परंपरेचे काटेकोरपणे पालन लासलगाव बाजार समितीच्या प्रशासनाकडून केले जात होते. या प्रचलित परंपरेला आता फाटा देत दर अमावस्येला सकाळच्या सत्रात कांद्याचे लिलाव सुरू करण्यात आले आहे. शनिवारी एका सत्रात सुरू असलेले कांद्याचे लिलावही दर शनिवारी दोन्ही सत्रात सुरू करण्यात आले आहेत. |
लिलाव बंद ठेवण्याचे हे कारण
नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि चांदवड तालुक्यातील गावांमधील शेतकऱ्यांची शेतीमाल विक्रीसाठी लासलगाव बाजार समितीची स्थापना करत शेतकऱ्यांना शेतीमाल विक्री करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. आधुनिक वाहनांची उपलब्धता नसल्याने बैलगाड्यांमधून कांदा व धान्य विक्रीसाठी येत असे. महिन्याच्या दर अमावस्येला आपल्यावर काही संकट येऊ नये म्हणून व्यापारी, शेतकरी आणि हमाल, मापारी हे बाजार समितीच्या आवारातील कांदा व धान्य लिलावाच्या कामकाजात सहभागी होत नसल्याने कांद्याचे व धान्य लिलाव बंद ठेवले जात असल्याचे बोलले जात आहे.
(lasalgaon market committee has taken a historic decision to start onion auction on amavasya)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.