लेखक : ॲड. नितीन ठाकरे
Spirituality and Religion : मनुष्य, मनुष्य जीवन व धर्म हे कधीही वेगळे होऊ शकत नाही. आजच्या युगात धर्माबद्दल अधिक चर्चा होतात आणि त्या होणे स्वाभाविक व काळाची गरज आहे. आपल्या राष्ट्राबद्दल समाजातील असलेली आस्था, प्रेम, भक्ती ही धर्माच्या माध्यमातूनच व्यक्त होत असते.
‘धर्म’ हा राष्ट्राचा प्राण आहे. राष्ट्राला धर्माचे अधिष्ठान असेल, राजा अन् प्रजा दोघेही धर्मपालक असतील तरच ते राष्ट्र सर्व संकटांतून मुक्त अन् सुखी होते. धर्माविषयी प्रेम वाटायला लागले, की धर्माविषयी अभिमान निर्माण होतो. धर्माविषयी अभिमान निर्माण झाला की धर्मरक्षण करण्याचे बळ आपल्या अंगी येते.
संपूर्ण इतिहासात धर्म हा समाज आणि मानवी अनुभवाचा एक मध्यवर्ती भाग बनून राहिला आहे. व्यक्ती ज्या वातावरणात राहतात, त्या वातावरणावर त्यांची प्रतिक्रिया कशी असते, हे समजून येते. धर्म हा जगभरातील समाजाचा एक महत्त्वाचा भाग असल्याने मनुष्य धर्मापासून वेगळा होऊच शकत नाही. (nashik latest article Dharmo Rakshati Rakshitah marathi news )
धर्म आणि अध्यात्म यातील फरक शोधण्यापूर्वी आपण प्रथम दोन शब्दांचे अर्थ स्पष्ट केले पाहिजेत. धर्माची व्याख्या देव किंवा देवतांची उपासना करण्याच्या श्रद्धा, सामान्यत: आचरण आणि विधीद्वारे व्यक्त करण्यात आली किंवा विश्वास, उपासना आदी कोणतीही विशिष्ट प्रणाली, ज्यात बहुतेकदा नीतिशास्त्र सामील असते.
अध्यात्माची व्याख्या अशी केली जाऊ शकते, ‘आध्यात्मिक, अ-भौतिक असण्याची गुणवत्ता किंवा वस्तुस्थिती’ किंवा ‘विचार, जीवन आदींमध्ये दर्शविल्याप्रमाणे प्रामुख्याने आध्यात्मिक चारित्र्यगुण. आध्यात्मिक प्रवृत्ती किंवा स्वर.’
थोडक्यात सांगायचे तर, धर्म हा विश्वास आणि विधींचा एक संच आहे, जो एखाद्या व्यक्तीला देवाबरोबर योग्य नात्यात येण्याचा दावा करतो आणि अध्यात्मात भौतिक/ पार्थिव गोष्टीऐवजी आध्यात्मिक गोष्टींवर आणि आध्यात्मिक जगावर लक्ष केंद्रीत केले जाते.
धर्म व व्यक्ती परस्परपूरक
लोक काय विचार करतात आणि ते जग कसे पाहतात, याला धर्म आकार देतो. धर्म हा सामाजिक कृतीचा एक नमुना आहे, जो विश्वास आणि प्रथांभोवती आयोजित केला जातो, जो लोक अस्तित्वाच्या अर्थाबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी विकसित करतात. धर्म व व्यक्ती हे परस्परपूरक आहे.
धर्माचे रक्षण हवे
समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून धर्माचा अभ्यास करताना धर्मावर कोणाचा विश्वास आहे, हे महत्त्वाचे नाही. धर्माचे त्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भात वस्तुनिष्ठपणे परीक्षण करण्याची क्षमता महत्त्वाची आहे. धर्म हा वंश, वय, लिंग आणि शिक्षण यांसारख्या इतर सामाजिक घटकांशी संबंधित आहे.
समाजशास्त्राच्या दृष्टीने पाहायचे झाले तर व्यक्ती, गट आणि समाज यांच्या धार्मिकतेचाही विचार केला जातो. धार्मिकता म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या (किंवा समूहाच्या) श्रद्धेच्या अभ्यासाची तीव्रता आणि सातत्य आहे. धर्माला मारल्यास मारलेला धर्मच (मारणाऱ्यास) मारतो व धर्माचे रक्षण केल्यास रक्षण केलेला धर्मच (रक्षणकर्त्यास) रक्षण करतो.
तेव्हा मारलेल्या धर्माने आपल्यालाच मारायला नको म्हणून धर्माला कदापि मारू नये. वृक्षाचे रोपटे लहान असताना आपण त्याची काळजी घेतो. झाड मोठे झाल्यावर आपण सावलीला बसतो. फळे खातो. झाड आपले उन्हापासून रक्षण करते. धर्माचे रक्षण केले तर धर्मही आपले रक्षण करतो. धर्माचा अर्थ कर्तव्यही आहे. म्हणजे तुम्ही धर्माचे रक्षण करा, धर्म तुमचे रक्षण करेल.
जबाबदाऱ्यांचे पालन म्हणजे धर्म निभावणे
व्यक्तीच्या आचारविचारांचे संघटन करून योग्य ती कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या योग्य त्या वेळी पार पाडण्याची वृत्ती आणि कृती ही धर्म होय. ‘धारयती इति धर्मः।’ अशी धर्माची सुटसुटीत व्याख्या आहे. व्यक्तीची त्याच्या संपर्कात येणाऱ्या किंवा असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीप्रति काही कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या प्रत्येक समाज घालून देत असतो.
उदाहरणार्थ, पिता म्हणून करायची कर्तव्ये, माता म्हणून करायची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या, भावंडांच्याप्रति (आपल्या स्थानाप्रमाणे) पार पाडायच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये अशी प्रत्येक भूमिकेची काही अलिखित कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या असतात.
ती-ती कर्तव्ये आणि त्या-त्या जबाबदाऱ्या यांचे त्या-त्या वेळी योग्य त्या प्रमाणात पालन करणे म्हणजे तो तो धर्म निभावणे, याच अर्थाने आपण जीवनभर निभावत असलेल्या प्रत्येक भूमिकेचा एक धर्म असतो आणि त्याप्रमाणे आपण वागावे, अशी समाजाची अपेक्षा असते. अशी जी कोणी व्यक्ती स्वधर्माचे व्यवस्थित पालन करते, तिचा धर्मच तिचे रक्षण करीत असतो, या अर्थाचे हे संस्कृत वचन आहे ‘धर्मो रक्षति रक्षितः।’ म्हणजे धर्मच धर्मपालन करणाऱ्याचे रक्षण करतो.
कारण जेव्हा समाजात अशा प्रकारे धर्माचे पालन व्यवस्थित करणाऱ्यावर कोणतेही संकट येते, तेव्हा त्यापासून त्याचा बचाव करण्याची जबाबदारी अशाच प्रकारे धर्मपालन करणाऱ्या समाजातील इतर घटकांवर येते आणि ती जबाबदारी ते-ते समाजघटक त्या-त्या वेळी उत्तम प्रकारे निभावतात. (latest marathi news)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.