पिंपळगाव बसवंत : वकील आणि काळा कोट हे समीकरण अगदी घट्ट आहे. काळा कोट घातलेला व्यक्ती हा वकीलच असतो, असा दृढ समज आहे. पण, यंदा उकाड्यात अधिक भर नको म्हणून न्यायालयीन कामकाज करताना काळ्या कोटाचा वापर करणे वकिलांसाठी ऐच्छिक ठेवण्यात आले.
कोट वापरला नाही तरी चालेल, अशी मुभा उच्च न्यायालयाने परिपत्रक काढून दिली. जूनअखेरपर्यंत वकिलांना काळ्या कोटाशिवाय काम करणे शक्य आहे. उन्हाच्या तडाख्यात कोटाला सुटी मिळाल्याने सर्वच न्यायालयांत वकील कोटाशिवाय कामकाज करताना दिसत आहेत. (Nashik lawyers Black Coat get off due to summer heat news)
उन्हाचा कडाका वाढू लागल्याने वकिलांना त्यांच्या पारंपरिक पोशाखात न्यायालयीन कामकाज करणे गैरसोयीचे ठरते. उत्तर महाराष्ट्रात यंदा सूर्य अधिकच आग ओकत आहे. त्यामुळे न्यायालयात टाय, सुटाबुटातील वकिलांची पारंपरिक पोशाखात अंगाची लाही-लाही होत असते.
याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून उच्च न्यायालयाने वकिलांना कोट वापरण्यास सवलत दिली आहे. त्यानुसार जूनअखेरपर्यंत न्यायालयीन कामकाजात काळ्या कोटाचा वापर ऐच्छिक असेल. काळा रंग हा सूर्यप्रकाश शोषून घेत असल्याने उन्हाळयात काळ्या रंगाचे कपडे वापरणे टाळले जाते. (latest marathi news)
वकिलांना हा त्रास होऊ नये म्हणून काळा कोट न वापरण्याची मुभा चार महिने देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या न्यायालयाच्या कामकाजात व आवारात वकील हे काळ्या रंगाच्या कोटाशिवाय दिसत आहेत. पिंपळगाव न्यायालय परिसरात फेरफटका मारला असता, वकील पांढऱ्या रंगाच्या शर्ट-पँटवर दिसत होते.
"कोटाशिवाय वकिली अशी कल्पनाही करू शकत नाही; पण वाढत्या तापमानात कोटामुळे वावरणे त्रासदायक ठरते. जूनअखेरपर्यंत काळ्या कोटाचे बंधन नाही. असे असले तरी सवयीचे झाल्याने काही वकील कोटाचा वापर करण्याला प्राधान्य देतात."
- ॲड. रणजित चव्हाण, अध्यक्ष, वकील संघ, पिंपळगाव बसवंत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.