नाशिक : राज्यातील विधानसभा निवडणूक प्रचाराचा धुरळा सोमवारी (ता. १८) सायंकाळी सहाला खाली बसला. दोन आठवड्यांच्या कालावधीत जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेत्यांच्या प्रचार तोफा धडाडल्या. रविवार सभांसाठी सुपर संडे ठरला. श्री. शिंदे, फडणवीस यांच्या सुटीच्या मुहूर्तावर सभा झाल्या. (Leaders meeting fueled campaigning of dignitaries including Prime Minister Modi)